नागपूर : पूजा केल्यास एक लाखाच्या मोबदल्यात एक कोटी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बांधकाम कंत्राटदाराला सात लाख ११ हजार रुपयांनी गंडा घालणाऱ्या चार ठकबाजांना धंतोली पोलिसांनी वणी येथे अटक केली. (four persons arrested for allegedly defrauding a person of rs one lakh in a lure)

पवन अरविंद लोहकरे वय ३५ रा. , पवन गौतम अलोणे वय २६ दोन्ही रा.वणी , पंकज बापूराव चौधरी रा.अहेरी व गोलू ऊर्फ अक्षय मारोती पेचे ररा.वडगाव,वरोरा,अशी अटकेतील ठकबाजांची नावे आहेत.

क्लिक करा आणि वाचा- चाकू नाही, लेखणीने दिले बळ; हातून गुन्हा घडलेल्या मुलांचे दहावीत यश

आरीफुद्दीन काजी (वय ४९,रा. जाफरनगर ) यांचे चुनाभट्टी परिसरात कार्यालय आहे. ते महाराज नावाच्या व्यक्तीला ओळखतात. वणीतील मांत्रिक माझ्या ओळखीचा आहे. पूजा करून तो एक लाखाचे एक कोटी रुपये करून देतो,असे आमिष दाखविले. काजी हे त्याच्यासोबत वणी येथे गेले. येथे महाराज याने पंकज व त्याच्या साथीदारांशी भेट घालून दिली. त्यानंतर चौघेही काजी यांना स्मशानभूमीत घेऊन गेले. तेथे पूजा केली.

क्लिक करा आणि वाचा- महावितरण आक्रमक; दहा ग्राहकांचा पुरवठा केला खंडित; २२ वीजचोऱ्या पकडल्या

त्यानंतर तीन दिवसांपूर्वी पंकज व त्याचे साथीदार नागपुरात आले. त्यांनी काजी यांच्या चुनाभट्टी परिसरातील कार्यालयात पूजा केली. पूजेत त्यांनी काजी यांना सात लाख ११ रुपये ठेवण्यास सांगितले. ही रक्कम लाल कापडात गुंडाळली. लिंबू स्मशानभूमीत ठेऊन येतो, असे सांगून पैसे घेऊन चौघेही पसार झाले.

क्लिक करा आणि वाचा- वाघोबासाठी बदलला मार्ग; अकोला-खंडवा रेल्वेचा तिढा सुटणार

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काजी यांनी धंतोली पोलिसांत तक्रार केली. धंतोली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्त डॉ.संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली धंतोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांन अवघ्या २४ तासांत वणी येथे चौघांना अटक केली. उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येऊन पोलिस कोठडी घेण्यात येईल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.