प्रेम होणे आणि एखादा व्यक्ती आपल्याला आवडू लागणे हे आपल्या हातात नसतं. ती अशी गोष्ट आहे जी कधीही, कुठेही आणि कशीही होऊ शकते. तो काळच आयुष्यातला सगळ्यात सुखाचा काळ असतो. आपण आणि आपला जोडीदार हेच आपण आपलं विश्व समजू लागतो आणि तो काळ कधीच संपू नये असे वाटते. प्रेमात असणाऱ्या प्रत्येकालाच अजून एक गोष्ट वाटत असते ती म्हणजे आपले नाते सर्वांना आणि अख्ख्या जगाला ओरडून सांगणे!

पण कधीकधी केवळ जोडीदार म्हणतो म्हणून अनेकांना ही गोष्ट करता येत नाही. कारण जोडीदाराला नातं जगासमोर मान्य करण्यासाठी अजून थोडा वेळ हवा असतो. त्यांच्या मते वेळ आलेली नसते. कधी कधी काही कपल्स एकत्र येऊन नंतर कधीतरी सांगायचं असा निर्णय घेतात. जगाला न सांगता बाकी रिलेशनशिप अगदी गोडीगुलाबीने सुरु असतं आणि इथेच येतो प्रकार पॉकेट रिलेशनशिप! (What is pocket Dating Or Relationship)

हा प्रकार नेमका आहे तरी काय?

पॉकेट रिलेशनशिप हा शब्द तुमच्यापैकी अनेकांनी ऐकला असेल आणि अनेकांनी ऐकला सुद्धा नसेल. पण हे गौडबंगाल आहे तरी काय हे आपण आधी जाणून घेऊया. समजा तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात आहात. तुमचे त्या व्यक्तीवर नितांत प्रेम आहे. तुमच्या मते तुमचे नाते सिरीयस आहे आणि आता ते तुम्ही जगाला सांगू शकता. पण तुमच्या जोडीदाराला असे वाटत नसते. त्यासाठी त्याला वेळ हवा असतो, पण हो एक जोडपं म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी करता. नातं सेक्स पर्यंत सुद्धा गेलेलं असतं. पण जेव्हा सगळ्यांना सांगण्याची वेळ येते तेव्हा तो टाळाटाळ करतो. तर मंडळी हेच आहे पॉकेट रिलेशनशिप! म्हणजे आपलं नातं जगासमोर उघड न करणे आणि पॉकेटमध्ये लपवून ठेवणे होय.

(वाचा :- चोरून चोरून तिला भेटायचो, मग असं काही घडलं की आयुष्यच उद्धवस्त झालं, इतकी वाईट परिस्थिती कोणाच पुरूषावर येऊ नये)

हा फायद्याचा प्रकार आहे तोट्याचा

तर मंडळी तुम्हाला सुद्धा माहित आहे की प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. एक चांगली बाजू असते आणि एक वाईट बाजू असते. पॉकेट रिलेशनशिप हा प्रकार सुद्धा काहीसा असाच आहे. पाहणारे यात फायदा पाहू शकतात पण सामान्यत: नीट पहायला गेलं तर ह्यात तोटे जास्त दिसतात. म्हणजे आपण एखाद्या सोबत रिलेशनशिप मध्ये राहायचं, त्याला आपलं सर्वस्व द्यायचं. अगदी नातं सिरीयसली निभवायचं. पण आपल्या जोडीदाराला ते नातं उघड करण्याची भीती असते. मग अश्याने हे नात खरंच आहे का हाच मुळात पहिला प्रश्न उभा राहतो.

(वाचा :- तब्बल 23 वर्ष माधुरी दीक्षितला खुश ठेवण्यासाठी मिस्टर नेने करतायत ही 5 कामे, फॉलो करा, संसार कधीच तुटणार नाही)

पॉकेट रिलेशनशिप कशी ओळखावी?

आता तुमचा जोडीदार कधीच तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही पॉकेट रिलेशनशिप मध्ये आहात. पण तुम्ही काही गोष्टींवरून तुमचा जोडीदार तुमच्या नात्याला पॉकेट रिलेशनशिपचं स्वरूप देतो आहे का ते ओळखू शकता. सोशल मिडीयावर तो तुमच्या सोबत फोटो टाकायला टाळाटाळ करत असेल, कमेंट करायला बघत नसेल, टॅग करायला नाही म्हणत असेल, मित्रांपुढे घेऊन जाताना सुद्धा आढेवेढे घेत असेल, घरी घेऊन जाण्याची वेळ आल्यावर वेळ मारून नेत असेल तर अशावेळी समजावं की हे पॉकेट रिलेशनशिपच आहे.

(वाचा :- स्वत:चं मुलंच ठरलं प्रेमात अडथळा, प्रेमाच्या परीक्षेत पत्नी सपशेल फेल असा नव-याचा आरोप..!)

अशा रिलेशनशिपमध्ये राहावं का?

जर तुमच्या जोडीदाराला खरंच काही समस्या असेल आणि त्याला वाटत असेल की एका ठराविक वेळीच हे नाते जगापुढे यावे आणि त्यासाठी तो तुम्हाला शब्द देत असेल व तुमचाही त्यावर विश्वास असेल तर काही काळ तुम्ही पॉकेट रिलेशनशिप मध्ये राहू शकता. पण जर तुमचा जोडीदार कसल्याच बाबतीत तुम्हाला निश्चित काही सांगत नसेल, नाते असे लपवण्यामागे त्याचा काय हेतू आहे किंवा त्यांचे नक्की काय कारण हे हे स्पष्ट सांगत नसेल तर अशा व्यक्तीवर विश्वास न ठेवलेला बरा. जो व्यक्ती नात्याबाबतच कन्फर्म नाही त्यासोबत तुम्ही भविष्याची स्वप्ने कशी काय रंगवू शकता?

(वाचा :- माझी कहाणी : एक दिवस माझा नवरा पाठलाग करत माझ्या ऑफिसमध्ये आला अन् आमच्यातील सगळंच संपलं, कारण ऐकून व्हाल थक्क)

फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत

याच पॉकेट रिलेशनशिपच्या माध्यमातून अनेकदा फसवणुकीचे प्रकार सुद्धा समोर आले आहे. अनेकदा मुले मुलींना आपल्या जाळ्यात ओढतात, अगदी खरे खुरे प्रेमवीर असल्यासारखे वागतात, विश्वास संपादन करतात आणि मग त्यांचा त्यांचा उपभोग घेतात. पण कधीच हे नाते त्यांना जगापुढे आणू देत नाही व एकदा मन भरलं की नातं तोडतात. केवळ मुलीच नाही तर मुलांबाबत सुद्धा असे प्रकार उघडकीस आले आहेत. ज्यात केवळ पैश्यासाठी मुली एकावेळी अनेक पॉकेट रिलेशनशिपमध्ये असतात आणि पैसा उकळून झाला की नाते तोडतात. अशावेळी आपणच सावध राहायला हवे आणि योग्य जोडीदाराची निवड करायला हवी.

(वाचा :- लग्नानंतर महिला गुगलवर सर्वात जास्त व वारंवार काय सर्च करतात? उत्तर ऐकून हैराण होतील जगातील सर्व पुरूष…!)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.