मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडी चौकशी सुरू आहे. सातत्यानं त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येत असल्यानं काँग्रेस कार्यकर्ते खूपच नाराज झाले आहेत. राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. दरम्यान, या आंदोलनावेळी काँग्रसचे नेते श्रीनिवास यांच्याबरोबर दिल्ली पोलिसांनी गैरवर्तन केले, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

VIDEO: नगरविकास शिवाय मुख्यमंत्री म्हणजे… सीरीजमधला डायलॉग तूफान व्हायरल

अभिनेता कमाल आर खान यानं हा व्हिडिओ पाहून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यानं ट्विटवर आपलं मत व्यक्त करत लिहिले की, ‘काय हे पोलीस आहेत. ते काँग्रेसचे नेते श्रीनिवासनं यांचे केस पकडून त्यांना ओढत आहेत. मला नाही वाटत याची काही गरज आहे. सत्ता आज आहे उद्या जाईल.’ केआरकेच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी भरभरुन कमेन्ट करायला सुरुवात केली आहे.

काय म्हणाले युझर्स

विनय सिंह नावाच्या एका युजरनं लिहिलं की, ‘तुम्हाला असं वाटत नाही का सहानुभूती मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात.’ अनिल अरोरा यानं लिहिलं की, ‘आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती आहे सध्या आपल्या देशाची. सत्तेविरोधात बोलणं कुणालाही आवडत नाही. बुलडोझर तयार आहे. सध्याचा काळ बघता गप्प रहाणं योग्य आहे. काळानुरूप सर्व काही बदलतं.’ तर आणखी एका युजरनं लिहिलं की, ‘सत्ता बदल होईल, पण पोलीस तेच आहे, परंतु केस अन्य कुणाचे तरी असतील… काम हे काम आहे.’

तर काही लोकांनी केआरकेवर टीका केली. राजेश अरोरा यानं लिहिलं की, ‘भावा, तू सिनेमसीक्षक आहेस ना. मग तोच रहा. राजकारणात कशाला घुसतो.’ तर आणखी एका युजरनं लिहिलं की, ‘श्रीनिवास प्रमाणे तू देखील विग लावायला हवा’ तर आणखी एका युजरनं लिहिलं की ‘तू भारतात परत कधी येणार आहेस… आम्ही कधीपासून तुमची वाट बघत आहोत.’ सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस आणि श्रीनिवास यांच्यात वाद झालेलाही दिसत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.