अकोला : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी) चंद्रकिशोर मीणा यांच्या नावावर चक्क पोलिस निरीक्षक आणि एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला पैशाची मागणी करून लाखो रुपयांनी गंडवल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी खुद्द आयजींनी या पत्रकाराची चौकशी केल्याचे समजते. सद्यस्थितीत या प्रकरणी कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाल नसून याची चौकशी आयपीएस रितू खोकर हे करीत आहे. (swindler cheated police officers for millions of rupees)

अकोला पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील अकोट शहरात एका मोठ्या दैनिक वृत्तपत्राच्या पत्रकाराने अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी) चंद्रकिशोर मीणा यांच्या नावाने अकोल्यातीलचं दोन पोलिस अधिकाऱ्यांना पैशाची मागणी केली. यामध्ये अकोट शहराचे पोलीस निरीक्षक आणि हिवरखेड पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार मनोज लांडगे यांच्याकड़े प्रत्येकी ३ लाख रूपये मागितले असल्याचे समोर आले. ही पैशाची मागणी चक्क पोलीस अधिकाऱ्यांना केल्याने या घटनेने पोलिस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली.

क्लिक करा आणि वाचा- सामाजिक परिवर्तनाची नांदी; परंपरेची चौकट मोडत अकोल्यात विधवांनी साजरी केली वटपौर्णिमा

‘आयची साहेब’ सध्या तुमच्यावर नाराज आहे, बहुतेक तुमची बदली करण्याच्या स्थितीत आहेत, असे म्हणत या पत्रकाराने या दोन्ही अधिकाऱ्यांकडे पैशाची मागणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांना लाखोंच्या घरात पैसे दिल्याचं समोर आले. याची माहिती आईची चंद्रकिशोर मीना यांना मीळताच त्यांनी लागलीच अकोट शहर पोलीस ठाणे गाठले अन् या पत्रकाराला ठाण्यात बोलवण्यात आले. अन् त्याची चौकशी करून नंतर सोडून देण्यात आले. या चौकशी संदर्भात मीणा हे अकोट पोलीस ठाण्यात तब्बल अडीच तास बसून होते.

क्लिक करा आणि वाचा- आई-वडिलांचं छत्र हरपलं, अनाथ लेकीसाठी बच्चू कडू झाले ‘बाप’, केलं कन्यादान

अशा प्रकारे करायचा पैशाची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुंद नामक पत्रकाराने एक मोबाईल क्रमांक आयजी चंदकिशोर मीणा यांच्या नावाने आपल्या मोबाइल’मध्ये सेव्ह केला. अन् यानंबरचे व्हाट्सअप देखील सुरु केले. त्याचे प्रोफाइल म्हणून मीणा यांचा फोटो ठेवला. मग, मुकुंद हा ‘ज्या’ अधिकाऱ्यांकडे पैशाची मागणीसाठी जायचा, या अगोदर बनावट नंबरहून मीणा यांच्या नावाने व्हाट्सअप’वर आलेले मेसेज संबंधित अधिकाऱ्यांना दाखवून पैशाची मागणी असलेला आकडे त्यांना दाखवत असायचा. ‘साहेब तुमच्यावर रागवलेले आहे, तुमची बदलीची शक्यता आहे, ती थांबवू शकतो, जे पोलिस वादात असून त्यांची चौकशी सुरु आहे यातून त्यांना क्लीन चीट देण्यात येईल,’ असे आमिष तो दाखवायचा. यासाठी तो पैशाची मागणी करायचा.

क्लिक करा आणि वाचा- वाढदिवसाच्या आदल्या दिवशी १७ वर्षीय मुलीचं टोकाचं पाऊल; रेल्वसमोर उडी घेत संपवलं जीवन

संबंधित दैनिकातून तत्काळ कारवाई अन् चौकशी सुरू

मुकुंद हा एका नामांकित दैनिक वृत्तपत्राचा अकोट शहर प्रतिनिधि म्हणून काम पाहत होता. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी लागलीचं वृत्तपत्राचे संपादकांशी चर्चा केली अन् तात्काळ त्याच्यावर कारवाई झाली. दरम्यान, मुकुंदने आतापर्यंत अनेक लोकांना लाखो रुपयांनी गंडवले असल्याचे समजते. त्याने आयजी यांच्या नावावर कित्येक लोकांकडून किती रुपये जमा केले, याचा तपास सुरु आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.