मुंबई : फिरकीपटू युझवेंद्र चहलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्याने आफ्रिकेच्या मधल्या फळीतील तीन प्रमुख फलंदाजांचे बळी घेत सामन्यात भारताला पकड मिळवून दिली. चहलला हर्षल पटेलने चार विकेट घेत चांगली साथ दिली. सामनावीर ठरलेल्या युझवेंद्र चहलने गेल्या दोन सामन्यांच्या तुलनेत तिसऱ्या सामन्यात आपली लय कशी साधली याबाबत खुलासा केला. फलंदाज आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने मंगळवारी तिसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ४८ धावांनी पराभव केला. आता राजकोट येथे चौथा टी-२० सामना खेळला जाणार आहे.

वाचा – द.आफ्रिकेचा अंदाज चुकला; पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने दिला दणका, पाहा व्हिडिओ

सामन्यानंतर चहल म्हणाला, “मी मागील सामन्यांमध्ये वेगवान आणि स्लाइडर चेंडू टाकले होते. पण आज मी सामन्यात माझी सीम पोझिशन बदलली. चेंडू फिरवून डीप करणे माझी ताकद आहे. आज मी गती कमी ठेवणे आणि चेंडू फिरवणे यावर लक्ष केंद्रित केले. माझी ताकद लक्षात घेऊन मी गोलंदाजी केली. मी त्यावर लक्ष केंद्रित केले.”

वाचा – आयपीएलच्या प्रसारण हक्कांमध्ये रिलायन्स आणि स्टारची बाजी, ‘टाइम्स इंटरनेट’चाही सहभाग

चहल पुढे म्हणाला, “फलंदाज जेव्हा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा गोलंदाजांना ते अवघड जाते. पण आता माझा वेगळा प्लॅन आहे आणि मी त्यानुसार फिल्ड सेट केली आहे. गेल्या सामन्यात मी चांगली गोलंदाजी केली नाही. प्रशिक्षकाने मला माझ्या ताकदीनुसार गोलंदाजी करण्यास सांगितले.” चहलला धोकादायक खेळाडू – रॅसी व्हॅन डर ड्यूसेन (१), ड्वेन प्रिटोरियस (२०) आणि हेनरिक क्लासेन (२९) यांच्या मोठ्या विकेट घेण्यात यश आले. चहलच्या कामगिरीमुळे भारताने हा सामना ४८ धावांनी जिंकून मालिकेत आव्हान कायम ठेवले.

‘करो या मरो’च्या सामन्यातील या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत आपले खाते उघडले आहे. पण पाच सामन्यांची मालिका अद्यापही पाहुण्या संघाच्या बाजूने १-२ अशी आहे. चौथा टी-२० शुक्रवारी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गुजरात येथे खेळवला जाईल. लक्षात घ्यायचे की राजकोटमध्ये मैदान मोठे आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.