मुंबई: अभिनेत्री जेनिफर कूलिज (Jennifer Coolidge) हिने एका मुलाखतीममध्ये तिच्या प्रसिद्ध ‘अमेरिकन पाय’ या सिनेमा सीरिजविषयी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. १९९९ साली आलेल्या या सिनेबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली की ती या भूमिकेमुळे २०० लोकांबरोबर (I slept with 200 people- Jennifer Coolidge) शय्यासोबत केली होती. तिच्या मते ‘अमेरिकन पाय’मुळे तिला केवळ प्रसिद्धीच नाही तर समाधान मिळाले होते.


अमेरिकन पायमधील अनुभवाबाबत काय म्हणाली जेनिफर?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हरायटी या मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये या ६० वर्षीय अभिनेत्रीने तिच्या करिअरविषयी काही वक्तव्य केली आहेत. जेनिफर म्हणते की १९९९ साली आलेला अमेरिकन पाय हा सिनेमा हिट झाला नसता तर मी २०० लोकांसोबत शय्यासोबत करू शकले नसते. तिने या सिनेमात स्टिफलरच्या आईची भूमिका साकारली होती. हे पात्र असे होते की, या महिलेला तिच्या मुलाच्या मित्रांसह रिलेशनमध्ये राहण्याची तिची इच्छा असायची. जिच्याकडे तरुण आकर्षित होतात अशा महिलेची भूमिका तिने साकारली होती.


मीडिया रिपोर्ट्सनुसार अमेरिकन पाय या सिनेमाने त्यावेळी वर्ल्ड वाइड १८०० कोटींची कमाई केली होती. अडल्ट कंटेट असणारा हा सिनेमा आजही लोकप्रिय आहे. जेनिफरने या मुलाखतीत असे म्हटले होते की प्रसिद्धी मिळण्याआधी तिला १० वर्षांपर्यंत विविध ऑडिशन्समधून रिजेक्ट करण्यात आले होते. त्यामुळे तिच्या मनातून भीती निघून गेली होती. तेव्हा तिला वाटायचे की आता तिच्याकडे गमावून बसण्यासाठी काही नाही आहे. मात्र अमेरिकन पाय सिनेमात काम मिळाल्यानंतर तिचे आयुष्य बदलले. तिने अलीकडेच The White Lotus या सीरिजमध्येही काम केले होते.

हे वाचा-‘माझ्यासोबत कुणाला काम करायचं नाही, अभिनेत्यांना हव्यात तरुण मुली’

या मुलाखतीमध्ये तिने करोना काळातील कठीण अनुभवाबाबतही भाष्य केले. तो काळ खूप दु:खद असल्याचे अभिनेत्री म्हणते. ती म्हणते की, ‘मी रोज दु:खद बातम्या वाचत होते. माझे स्वत:चे वजन वाढले होते. माझ्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत होता.’ यावेळी बोलताना अभिनेत्री असंही म्हणाली की तिने तिच्या आयुष्यात खूप चांगले मित्र कमावले आहेत. दरम्यान अभिनेत्री लवकरच ‘लीगली ब्लाँड ३ या सिनेमात दिसणार आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.