नवी दिल्ली : काँग्रेसनं (Congress) आज महागाई आणि बेरोजगारीच्या (Unemployment ) मुद्यावर देशभरात आंदोलन केलं. काँग्रेसनं आज राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी आंदोलन जाहीर केलं होतं. दिल्ली पोलिसांनी प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) आणि अन्य काँग्रेस नेत्यांना दिल्लीतील पक्ष कार्यालयाच्या बाहेर दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी प्रियांका गांधी यांनी भर रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. प्रियांका गांधी यांना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं. यावेळी देखील प्रियांका गांधी यांनी संघर्ष केला. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. प्रियांका गांधी रस्त्यावर ज्याप्रमाणं ठिय्या मारुन बसल्या होत्या तसाच राहुल गांधी यांचा देखील एक फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.

राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासस्थानाला घेराव घालण्यापूर्वी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात खासदार संसदेत पोहोचले आहेत. काँग्रेसनं आज महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावर चलो राष्ट्रपती भवन मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र, दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणावरुन प्रमुख ठिकाणी बॅरिकेडिंग केलं होतं. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी महागाई मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं म्हटलं. सिलिंडर घेऊन त्या आंदोलनात सहभागी झाले होत्या.

काँग्रेसचं ट्विट

तोपर्यंत ‘आरे’तील एकही झाड तोडू नये; सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला दणका

काँग्रेस कार्यालयाबाहेर प्रियांका गांधीचा ठिय्या

प्रियांका गांधी यांनी महागाईच्या मुद्यावर काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. प्रियांका गांधी यांच्यासह इतर काँग्रेस नेते देखील त्यावेळी उपस्थित होते. प्रियांका गांधी ठिय्या आंदोलनावर ठाम असल्यानं दिल्ली पोलीस दलातील महिला पोलिसांनी प्रियांका गांधीना ताब्यात घेतलं. त्यापूर्वी प्रियांका गांधी यांनी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना अडवण्यासाठी लावलेल्या बॅरिकेडचा अडथळा भेदण्याचा प्रयत्न केला होता.

संजय राऊत ईडी कोठडीत, ‘सामना’च्या संपादक पदाबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीच्या विरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं होतं. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनावर मोर्चाचं आयोजन केलं होतं. दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा दिल्लीतील विजय चौकात थांबवला. काँग्रेसकडून राष्ट्रपती भवनाला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला होता. काँग्रेस काँग्रेसनं देशभर याप्रकरणी आंदोलन आयोजित केलं होतं. काँग्रेसशासित राजस्थान, छत्तीसगड आणि इतर राज्यांमध्ये देखील जोरदार आंदोलन करण्यात आलं.

मोदी-उद्धव ठाकरेंचं बोलण झालं होतं, पण ‘त्या’ एका गोष्टीमुळे सगळं फिस्कटलं: केसरकरSource link

Leave a Reply

Your email address will not be published.