मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिचा पती आणि गायक निक जोनाससोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. प्रियांका आणि निकने यावर्षी सरोगसीद्वारे त्यांच्या मुलीचे मालतीचे स्वागत केले. दोघांनीही तिची झलक अद्याप दाखवली नसली तरी प्रियांकाने चेहरा न दाखवता काही फोटो शेअर केले आहेत. अलीकडेच तिची आई मधू चोप्रा यांच्या वाढदिवसानिमित्त प्रियांकाने मुलगी आणि आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मालतीसोबत हसताना दिसत आहे.

स्वप्न पाहावं तर असं! अजय पुरकर यांनी बांधलं ऐतिहासिक भूमीत घर

प्रियांकाने तिच्या आईसाठी खास पोस्ट शेअर केली

इंन्सटाग्रामवर प्रियांकाने स्वतःचा आणि मधू यांचा लहान मालतीला हातात धरलेला एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये मधू कॅमेऱ्याकडे पाहून हसत आहेत, तर प्रियांका मालतीकडे पाहत आहे. फोटोत मुलीचा चेहरा दिसत नाही. आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रियांकाने लिहिले, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. तुझ्या या सकारात्मक हास्याने तू सदैव हसत राहा. तू मला तुझ्या आयुष्याबद्दलच्या उत्साहाने आणि प्रत्येक दिवसाच्या अनुभवाने खूप प्रेरणा देतेस. तुझी युरोप सोलो ट्रिप ही मी पाहिलेल्या तुझ्या वाढदिवसांच्या सेलिब्रेशनमधील सर्वोत्तम ट्रीप होती. खूप सारं प्रेम आजी.’


सरोगसीच्या माध्यमातून मुलगी मालतीचा जन्म

प्रियांका आणि तिचा पती निक जोनस यांनी जानेवारीत सरोगसीद्वारे आपल्या मुलीचे स्वागत केले. चार महिन्यांपूर्वी तिचा जन्म झाला. निक आणि प्रियांकाने मे महिन्यात इन्स्टा पोस्ट शेअर करून त्यांच्या घरी मुलीचं आगमन झाल्याचं सांगितलं. मालतीचा जन्म वेळेआधी झाल्यामुळे तिला घरी आणण्यापूर्वी १०० दिवस NICU मध्ये ठेवावे लागले होते.

बूट घालून मंदिरात शिरताना दिसतोय रणबीर, नेटकऱ्यांचा राग अनावर

निक जोनास आणि प्रियांका चोप्राची मुलगी

निकने अलीकडेच खुलासा केला की त्याला आणि प्रियांकाला त्यांचा प्रवास इतरांसोबत शेअर करणं हा योग्य निर्णय असल्याचं वाटलं. या आव्हानांचा सामना जे इतर लोक करतात ते या प्रवासात एकटे नसतात हे त्यांना कळावं यासाठी त्यांचा अनुभव शेअर करणं महत्त्वाचं होतं असं निकला वाटतं. ‘पीपल मॅगझिन’शी बोलताना निक म्हणाला, ‘मला वाटतं की आम्ही सोशल मीडियावर जे काही शेअर केलं होतं, ते आमचं बाळ घरी आल्याचं सांगितलं होतं. पण हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती या आमच्या प्रवासाचा एक भाग होते. हे अनेक प्रकारे डोळे उघडणारे होते.’

सिद्धार्थ जाधवनं घेतली भन्नाट कार?; लांबी मोजायला मोजपट्टीही कमी पडेल

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.