गरोदरपणात महिलांचे केस दाट आणि लांब होतात, मात्र प्रसूतीनंतर महिलांना केस गळण्याची समस्या सुरू होते. यावेळी काही महिलांचे केस खूप गळू लागतात. पण आहारामध्ये बदल केल्यास आपण या गोष्टींवरती मात मिळवू शकतो.अमेरिकन प्रेग्नन्सी असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, 40 ते 50 टक्के महिलांना प्रसूतीनंतर केस गळतात. प्रसूतीनंतर केस गळणे सामान्य आहे.

गर्भधारणेदरम्यान, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या वाढीमुळे, केस आणि नखांची वाढ देखील वाढते. जेव्हा गर्भधारणेनंतर हे हार्मोन्स कमी होतात तेव्हा केसांच्या वाढीचा टप्पा घसरतो आणि केस गळणे सुरू होते. पण तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही काही गोष्टींचा समावेश केला तर तुम्ही केस मजबूत करु शकता. घरातील हे पदार्थ तुमच्या केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या.
(फोटो सौजन्य :- टाइम्स ऑफ इंडिया )

प्रोटीन

केसांच्या वाढीसाठी प्रोटीन खूप महत्वाचे असते. प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस गळतात. त्यामुळे तुमच्या आहाराच योग्य तेवढया प्रोटीनचा समावेश करा. अंड्यातील पिवळ बलक, सुकामेवा आणि बिया, दूध, दही, एवोकॅडो आणि रताळे यांपासून प्रोटीन मिळू शकते.

(वाचा :- Face Shaving : मुलींनो चेहऱ्यावरील केस शेविंग करुन काढताय?, मग या ५ टिप्स नक्की लक्षात ठेवा)

व्हिटॅमिन ए चे सेवन

दात, स्केलेटल टिश्यू आणि त्वचा सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ए आवश्यक पोषक तत्व आहे. त्यामुळे तुमचे केस वाढण्यास मदत होईल. गाजर, रताळे, भोपळा, पालक, काळे, दूध, दही आणि अंडी यामध्ये व्हिटॅमिन ए आढळते. त्यामुळे या गोष्टींचा वापर आहरात करा.

(वाचा :- दाढी वाकडी तिकडे व पॅचमध्ये वाढलीये? फक्त करा ‘हे’ 7 जबरदस्त उपाय, पोरी होतील फुल इंप्रेस, झटक्यात दिसाल आकर्षक व स्मार्ट..!)

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन ई प्रमाणे, व्हिटॅमिन सी देखील एक प्रभावी अँटिऑक्सिडेंट आहे. यामुळे केसांचा पोत सुधारणास मदत होईल. खरबूज, संत्री, आंबा, पपई, अननस, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी आणि टरबूज यासारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. जर तुम्हाला केसांची गळती थांबवायची असेल तर या फळांचा आहारात समावेश करा.

(वाचा :- दाढी वाकडी तिकडे व पॅचमध्ये वाढलीये? फक्त करा ‘हे’ 7 जबरदस्त उपाय, पोरी होतील फुल इंप्रेस, झटक्यात दिसाल आकर्षक व स्मार्ट..!)

झिंकचा आहारात समावेश

झिंक एक आवश्यक अँटिऑक्सिडेंट आहे. याच्या कमतरतेमुळे केस गळण्याची समस्याही उद्भवू शकते. प्रसूतीनंतर केस गळणे टाळण्यासाठी झिंकयुक्त पदार्थ खावेत. यामध्ये सीफूड, अंडी, बीन्स आणि कडधान्ये, दही, काजू, चणे आणि चीज यांचा समावेश आहे.

(वाचा :- दातांवरील पिवळ्या काळ्या डागांनी हैराण आहात? हे घरगुती उपाय करुन पाहा, दात मोत्यासारखे चमकतील)

व्हिटॅमिन ई

केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन ई देखील महत्त्वाचे असते. यामुळे तुमच्या केसांचा चांगली वाढ होते. ऑलिव्ह, सूर्यफूल, कॉर्न, नट आणि बिया आणि पालक, ब्रोकोली यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमधून तुम्हाला व्हिटॅमिन ई मिळू शकते.

(वाचा :- खाइके पान बनारस वाला !, दाट, लांबसडक केसांसाठी खाण्याच्या पानांचा असा करा वापर)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.