धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ‘सैराट’ चित्रपटातील घटना प्रत्यक्षात घडल्याचे बघायला मिळाले आहे. बावीस वर्षीय बहिणीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय व ती पळून जायच्या बेतात असल्याचा राग मनात धरून तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिला गळफास लावून खून करत रात्रीच तिचा अंत्यविधी उरकून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी अत्यंत शिताफीने संशयित भावास गजाआड केले आहे.

काय आहे प्रकरण?

संदिप रमेश हालोर (वय 24 वर्ष) याला त्याची बहीण पुष्पा हिचे कोणाशीतरी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या कारणावरुन तिला मारहाण करत त्याने गळफास लावून मारले. नंतर रात्रीच तिचा अंत्यविधी आटोपून टाकला, अशी गोपनीय माहिती मिळाल्याने निजामपूर पोलिस तपास पथकाने हट्टी गाव परिसरात रवाना होऊन बातमीची खातरजमा केली असता आरोपी संदीप हालोर हा गावातच मिळून आला. दरम्यान पोलिसांनी त्याला विश्वासात घेवून विचारपूस केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी संदीपला खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. हट्टी गावशिवारातील शिवमेंढा येथे रात्रीचे तीन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. बहीण पुष्पा रमेश हालोर वय-22 हिचे एका मुलाशी प्रेमसंबंध असल्याने ती पळून जाण्याच्या बेतात होती, असा दावा आरोपीने केला. त्याचा राग मनात धरून त्याने तिच्या अंगावरील साडीची लेस फाडून लिंबाच्या झाडाला बांधून फास तयार केला. त्यानंतर तिला गळफास लावून जीवे ठार मारण्याच्या इराद्याने ढकलून देत तिचा जीव जाईपर्यंत तो तेथेच थांबून राहिला.

हेही वाचा : विवाहित महिलेच्या विवस्त्र मृतदेहाचं गूढ उकललं, अंगावर काटा आणणारा हत्येचा घटनाक्रम

सर्व घटना घडल्यानतर घरी जाऊन पुष्पा हिने स्वत:च्या हाताने गळफास घेतल्याचे भासवून आई व मित्रांसह गावातील लोकांना त्याने खोटी माहिती दिली व पहाटे पाचच्या सुमारास तिच्यावर घाईघाईत अंत्यसंस्कार देखील केले. अंत्यविधी करते वेळी तिच्या अंगावरील सर्व कपडे, तसेच गळफास तयार केलेली साडीची लेस असे सर्व पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने दहनात टाकून पुरावे नष्ट केल्याचे सांगितले.

हेही वाचा : माहेरच्या उंबरठ्यावरच भावाने बहीण-मेहुण्याला संपवलं, लग्नानंतर पाचव्याच दिवशी खून

यानंतर निजामपूर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा छडा लावत आरोपी भावाला गजाआड केले असून साक्री न्यायालयाने आरोपी भावाला 19 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : दारु पिऊन आईला का छळता? बाईकवर बसवून बापाला रानात नेलं, कोयत्याने १० वेळा वार 92285965Source link

Leave a Reply

Your email address will not be published.