सातपुडा भवनमधील वैद्यकीय शिक्षण विभागात कार्यरत असलेले वरिष्ठ लिपीक हिरो केसवानी यांच्या बेहिशोबी मालमत्तेच्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे सातत्याने येत होत्या. यानंतर, ईओडब्ल्यूने तक्रारीची पडताळणी केली आणि त्यानंतर बुधवारी पहाटे बैरागढच्या मिनी मार्केटमधील हिरो केसवानी यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान ईओडब्ल्यूचे डझनभर अधिकारी हिरो केसवानी यांच्या घरी पोहोचले.
हेही वाचा – पार्थ चॅटर्जींकडे ११ वर्षांपूर्वी होती केवळ ६३०० रोख रक्कम, आता नोटांचे गठ्ठेच्या गठ्ठे
कधीकाळी फक्त ४ हजार रुपये दर महिना पगार
या लिपिकाचा सुरुवातीला पगार फक्त ४ हजार रुपये असल्याची माहिती आहे आणि सध्या त्याचा पगार ५० हजार रुपये दर महिना आहे. त्यामुळे त्याच्या घरात इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडणे हे हैराण करणारं आहे.
अधिकाऱ्यांनी छापा टाकताच लिपिकाची तब्येत बिघडली
बैरागढ परिसरातील मिनी मार्केट रोडवर असलेल्या या सरकारी कर्मचारी हिरो केसवानी यांच्या घरावर ईओडब्ल्यूने छापा टाकला. हिरो केसवानी यांना ही समजताच त्यांची तब्येत खराब झाली. त्यानंतर हिरो केसवानी यांना उपचारासाठी बैरागढ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा-ही तर अलिबाबाची गुहा! २९ कोटी रोख, ५ किलो सोनं; अर्पिता मुखर्जीच्या टॉयलेटमध्ये सापडलं घबाड
८५ लाखांची रोकड, जमिनीचे कागद आणि सोनं-चांदी
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरातून सुटकेसमधून तब्बल ८५ लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. तर काही मालमत्तेची कागदपत्रेही सापडली आहेत, याशिवाय सोने-चांदीही सापडले आहे. अजूनही त्यांच्या घरी अधिकारी छापेमारी करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ईओडब्ल्यूकडे सातपुडा भवनमध्ये नियुक्त वरिष्ठ लिपीकाच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे ईओडब्ल्यूने ही मोठी कारवाई केली आहे.
हेही वाचा-आधी कोट्यवधींची रोकड अन् सोनं; आता अर्पिता मुखर्जीच्या घरात सेक्स टॉईज सापडले
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत अडचणीत, मुंबईतील घरी ED चे अधिकारी दाखल