चंद्रपूर : चंद्रपूरचे अपक्ष आमदार जोरगेवारांनी घोडेबाजार शब्दावर नाराजी व्यक्त करीत वेगळा विचार करण्याचा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला होता. जोरगेवारांची नाराजी दुर करण्यासाठी चंद्रपूरचा दौऱ्यात आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरगेवारांची भेट घेतली होती. राज्यसभेचा सहा जागांचा निकाल लागला. यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेली राजकीय खेळीची चर्चा राज्यात रंगली आहे. अशात चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा खेळीवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

काय म्हणाले जोरगेवार?

राज्यसभेत विजयी झालेल्या सहा उमेदवारांना जोरगेवारांनी शुभेच्छा दिल्यात. २४ वर्षानंतर ही राज्यसभेची निवडणूक प्रथमच झाली. भारतीय जनता पार्टीनं योग्य अभ्यास करीत जी खेळी खेळली. ती वाखाण्याजोगी आहे. आपल्या पहिल्या दोन उमेदवारांना ४८, ४८ मत द्यायला लावणं आणि दुसऱ्या पसंतीची मतं आपल्या तिसऱ्या उमेदवाराकडे वळतं करणं हे त्यांनी गणित शास्त्राचा अभ्यास करीत केलं असावं.

‘राजकारण माझा धंदा नाही’; राऊतांनी केलेल्या टीकेला शेकाप आमदाराचं रोखठोक प्रत्युत्तर
महाविकास आघाडीबद्दल काय बोलले जोरगेवार?

अपक्ष आमदार महाविकास आघाडीसोबत नव्हते, असं म्हणनं चुकीचं ठरेल. जर अपक्ष आमदार सोबतीला नसते तर महाविकास आघाडीला मिळालेलं मताधिक्य दिसलं नसतं. राज्यात लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांची संख्या २९ आहे. त्यातील एक दोन मत इकडं तिकडं गेली असतीलही मात्र महाविकास आघाडीसोबत ते प्रामाणिक राहीले, हे खरं आहे.

राष्ट्रपती निवडणूकीसाठी ममतांची मोर्चेबांधणी; भाजपला रोखण्यासाठी विरोधकांची मोट बांधणारSource link

Leave a Reply

Your email address will not be published.