पिंपरी : निवडणुकीचा आनंद शिगेला पोहचला होता, की आपलेच सगळे लोक निवडून येणार, असं त्यांना वाटत होतं, अशा परिस्थितीत आपल्या नेत्याने असा काय डाव टाकला, आज सकाळपासून त्यांना जेवण गेलेलं नाही, पाणी प्यायलेले नाहीत, विरोधकांना इतकी वाईट वाईट स्वप्नं पडायला लागलेली आहेत, 20 तारखेला देवेंद्रजी अजून काही करतात की काय, अशी भीती महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेली आहे, असा टोला पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी लगावला आहे.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने ३ जागांवर विजय मिळवला. सहाव्या जागेसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा भाजपने दारुण पराभव केला. ही विजयाची घोडदौड यापुढील काळात कायम राहील, असेही महेश लांडगे म्हणाले आहेत.

पिंपरी-चिंचवडचे लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप आणि पुण्यातील कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आजारी असतानाही मतदानासाठी विधानभवनात आल्या. हा भाजपाच्या विचारांचा आणि कर्तव्यनिष्ठेचा विजय असल्याचे लांडगे म्हणालेत.

हेही वाचा : राऊतांचं वक्तव्य अपुऱ्या माहितीवर, सेनेच्या उमेदवारांनाच मतदान, संजयमामा शिंदेंनी आरोप फेटाळले

राज्यसभा सदस्य निवडणुकीत भाजपाच्या विजयानंतर पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात विजयोत्सव साजरा करण्यात आला. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली या निवडणुकीत भाजपाने यश मिळवले. भाजपा उमेदवारांना मतदान करणाऱ्या सर्व आमदारांचे आभार लांडगे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : पराभव जिव्हारी, शिवसेनेच्या गोटात हालचाली, ‘वर्षा’वर ज्येष्ठ नेत्यांचा काथ्याकूट

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ असूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना फोडले आणि महाविकास आघाडीला पराभवाची धूळ चारली. भाजपने सहापैकी तीन जागा जिंकून विजयाचा गुलाल उधळला. त्यामुळे शिवसेना उमेदवार संजय पवार पराभूत झाले. हा पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला असून शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत ‘वर्षा’ निवासस्थानी तातडीने महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचा : देहविक्रय करणाऱ्या महिलांमुळेच समाजात बॅलन्स टिकून, अमृता फडणवीसांचं मत

संजय राऊतांचे थेट आरोप

राज्यसभा निवडणुकीत आम्ही निसरड्या वाटेवर होतो. ज्या लोकांनी आम्हाला शब्द दिला होता ते पाळले गेले असते तर शिवसेनेच्या उमदेवाराचा पराभव झाला नसता. विशेषत: वसई-विरारच्या हितेंद्र ठाकूर यांची तीन मते आम्हाला मिळाली नाहीत. त्यानंतर करमाळ्याचे संजयमामा शिंदे, नांदेडचे श्यामसुंदर शिंदे आणि देवेंद्र भुयार या आमदारांची मते आम्हाला मिळाली नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीची सगळी मतं जशीच्या तशी आम्हाला मिळाली आहेत. फक्त घोडेबाजारातील सहा-सात मतं न मिळाल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला, असेही संजय राऊत सकाळी म्हणाले होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.