अमृतानं शेअर केला Video, ७५ वर्षांच्या ज्योती यांनी अभिनेत्रीला काय दिलं
इंडियन आयडलच्या मंचावर दिसलेल्या फरमानीने गायलेल्या हर हर शंभो गाण्यावर देवबंदी उलेमा नाराज झाले आहेत. फरमानीने गायलेलं हे भजन कावड यात्रेत लोकप्रिय झालं. पण देवबंदी उलेमाने फरमानीला हे धर्माच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. त्यावरून सोशलमीडियावर हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. पण कलाकार म्हणून मी हे गाणं गायलं असून, गाणं म्हणूनच मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचं फरमानी सांगते.
फरमानी मुजफ्फरनगरमध्ये राहणारी एक गरीब महिला आहे. गाणी गाऊन मिळणाऱ्या कमाईवर तिचा संसार चालतो. २०१७ ला फरमानीचं लग्नं झालं होतं. सुरुवातीला नवऱ्यासोबत छान चाललं होतं. वर्षभरातच तिला मुलगा झाला. पण त्यानंतर नवऱ्याने तलाक न देताच तो तिला सोडून गेला. नवरा सोडून गेल्यावर सासरी तिचा छळ सुरू झाला. त्यात मुलगा आजारी पडला त्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा तिच्यामागे सुरू झाला.
या त्रासाला कंटाळून फरमानीनं सासर सोडलं आणि मुलासोबत ती माहेरी राहायला लागली. तिच्या नवऱ्यानं दुसरं लग्नं केल्याचं तिला समजल्यानंतर ती कोलमडली, पण तिच्या गाण्याने तिला उभारी दिली. इंडियन आयडॉल २०२० मध्ये ती सहभागी झाली. तिच्या गाण्याने परीक्षकांची मनंही जिंकली, पण याच दरम्यान तिच्या मुलाची तब्येत बिघडल्याने तिला हा शो सोडून द्यावा लागला.
मी माझी ब्रा का लपवायची? आलिया भट्टचा रोखठोक प्रश्न, अभिनेत्रीला सेक्सिस्ट कमेंटबद्दल आहे चीड
अनंत अडचणी आल्या तरीही फरमानी डगमगली नाही. मुलाची जबाबदारी सांभाळून गाण्यासाठी वेळ दिला. तिनं यूट्यूब चॅनेल सुरू केलं आणि त्यावर गाण्याचे व्हिडिओ पोस्ट केले. बघता बघता तिचे फॉलोअर्स मिलियन्समध्ये गेले. यासाठी तिच्या गावातील राहुलने तिला मदत केली. तिचे व्हिडिओ इतके व्हायरल झाले की फरमानी स्टार झाली. नुकत्याच तिने गायलेल्या हर हर शंभो गाण्यालाही अशीच तुफान लोकप्रियता मिळाली. ७ लाख लोकांनी तिचं हे गाणं पाहिलं, ऐकलं आणि कौतुकाचा वर्षाव केला. मात्र काही मुस्लिम कट्टरवाद्यांनी तिला विरोध करायला सुरुवात केली.
जगात ९९ टक्के लोकांना पहिलं प्रेम मिळतच नाही- रवी जाधव