‘फाइव्ह जी’ स्पेक्ट्रमचा लिलाव अखेर सात दिवसांनी सोमवारी संपला. स्पेक्ट्रमच्या लिलावांतून केंद्र सरकारच्या तिजोरीत एक लाख ५० हजार १७३ कोटी रुपयांची भर पडली आहे. ‘रिलायन्स जिओ’, ‘भारती एअरटेल’, ‘व्होडाफोन आयडिया’ आणि गौतम अदानी यांच्या ‘अदानी डेटा नेटवर्क्स’ने स्पेक्ट्रमसाठी बोली लावली होती. दीड लाख कोटी रुपयांसह केंद्र सरकारने लिलावातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा जुना विक्रम मोडला आहे. २००५मध्ये केंद्राने ‘फोर जी’ स्पेक्ट्रमद्वारे १.०९ लाख कोटी रुपयांची बेगमी केली होती. यंदा ४.३ लाख कोटी रुपयांचे एकूण ७२ गिगाहर्ट्‌झ स्पेक्ट्रम लिलावात ठेवण्यात आले होते. या स्पेक्ट्रमची मुदत २० वर्षे आहे. देशभरात ही सेवा सुरू होण्यासाठी तीन महिन्यांहून अधिक कालावधी लागणार आहे.

‘रिलायन्स जिओ’ आघाडीवर

– ‘रिलायन्स जिओ’ने सुरुवातीपासूनच लिलावांत आघाडी घेतली होती.

– त्यापाठोपाठ ‘भारती एअरटेल’ने प्राथमिक सर्कलमध्ये बोली लावली.

– ‘अदानी नेटवर्क्स’ने २६ गिगाहर्ट्‌झ बँडसाठी बोली लावली.

१८०० मेगाहर्ट्‌झसाठी स्पर्धा

– उत्तर प्रदेश पूर्व सर्कलमधील १८०० मेगाहर्ट्‌झ स्पेक्ट्रमची बोली बराच काळ लांबली.

– या सर्कलमधील स्पेक्ट्रमची प्रति युनिट किंमत वाढून १६०.५७ कोटी रुपयांवर गेली.

– या बँडसाठी बेस प्राइस प्रति मेगाहर्ट्‌झ ९१ कोटी रुपये होती.

– लिलावाची किंमत बेस प्राइसच्या ७६.५ टक्के अधिक आहे.

– या सर्कलमध्ये सर्वाधिक म्हणजे १० कोटी ग्राहक आहेत.

‘जिओ’कडून ~ ८४,००० कोटी खर्च

– विश्लेषकांच्या मते ‘जिओ’ची एकूण स्पेक्ट्रम खरेदी ८४,५०० कोटी रुपयांहून अधिक आहे.

– ‘एअरटेल’ने ४६,५०० कोटी रुपयांहून अधिक स्पेक्ट्रमची खरेदी केली.

– ‘व्होडाफोन-आयडिया’ने १८,५०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या स्पेक्ट्रमची खरेदी केली.

– ‘अदानी नेटवर्क्स’ने ८०० ते ९०० कोटी रुपयांची रक्कम खरेदीसाठी खर्च केली.

– हा लिलाव प्रामुख्याने ‘लो’, ‘मीडियम’ आणि ‘हाय फ्रिक्वेन्सी’ रेडिओलहरींसाठी होती.

रेडिओलहरींमधील फरक

१) हाय बँड : जास्त घनता असलेल्या क्षेत्रांमध्ये हाय बँड फ्रिक्वेन्सी वापरली जाते. या फ्रिक्वेन्सीचे सिग्नल उच्च दर्जाचे असतात. इंटरनेटचा वेग सर्वाधिक २० जीबीपीएस.

२) मिड बँड : निमशहरी क्षेत्रांमध्ये मिड बँडद्वारे सेवा दिली जाणार आहे. या फ्रिक्वेन्सीचे सिग्नल चांगले असून, त्यांचे कव्हरेजही चांगले असते. इंटरनेटचा वेग १.५ जीबीपीएस.

३) लो बँड : ग्रामीण भागांसाठी प्रामुख्याने हे बँड वापरले जातात. या बँडचे कव्हरेज मोठ्या क्षेत्रासाठी परिणामकारक असतात. इंटरनेटचा वेग १०० एमबीपीएस, वेग कमी.

कोणत्या बँडसाठी लिलाव?

१) लो बँड : ६०० मेगाहर्ट्‌झ, ७०० मेगाहर्ट्‌झ, ८०० मेगाहर्ट्‌झ, ९०० मेगाहर्ट्‌झ, १८०० मेगाहर्ट्‌झ, २१०० मेगाहर्ट्‌झ, २१०० मेगाहर्ट्‌झ, २३०० मेगाहर्ट्‌झ, २५०० मेगाहर्ट्‌झ

२) मीडियम बँड : ३३०० मेगाहर्ट्‌झ

३) हाय फ्रिक्वेन्सी बँड : २६ गिगाहर्ट्‌झSource link

Leave a Reply

Your email address will not be published.