वाचा: मस्तच! Nothing स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता, किंमत २५ हजारांच्या बजेटमध्ये; पाहा डिटेल्स
PhonePe ला ब्लॉक करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
- PhonePe यूजर्स ०८०६८७२७३७४ अथवा -२२६८७२७३७४ या नंबरवर कॉल करू शकतात.
- त्यानंतर PhonePe अकाउंटमध्ये कोणतीही समस्या रिपोर्ट करण्यासाठी सांगितलेला नंबर दाबा.
- व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ओटीपी पाठवला जाईल.
- तुम्ही I have not received an OTP देखील निवडू शकता.
- सिम अथवा डिव्हाइस हरवला असल्याची माहिती देण्यासाठी ठराविक पर्याय निवडा.
- यानंतर कस्टमर सपोर्ट टीम तुम्हाला काही माहिती विचारेल. ही माहिती व्हेरिफाय करून कंपनी फोन पे अकाउंटला ब्लॉक करण्यासाठी तुमची मदत करेल.
Google Pay ला ब्लॉक करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
- Google Pay अकाउंट ब्लॉक करण्यासाठी १८००४१९०१५७ या नंबरवर फोन करू शकता.
- यानंतर कस्टमर सपोर्ट गुगल पे अकाउंटला ब्लॉक करण्यासाठी मदत करेल.
- याशिवाय, तुम्ही जर अँड्राइड डिव्हाइसचा वापर करत असल्यास गुगल पे अॅप आणि गुगल अकाउंटचा अॅक्सेस रोखण्यासाठी remotely डेटा डिलीट करू शकता.
- iOS यूजर्स देखील रिमोटली डेटा डिलीट करू शकता. अशाप्रकारे, तुम्ही फोन हरवल्यास Phone Pe , Google Pay अकाउंट ब्लॉक करू शकता.
वाचा: तुमच्या आधार कार्डवर किती मोबाइल नंबर रजिस्टर्ड? असे घ्या जाणून