नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय भवितव्याचा फैसला आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) होणार आहे. शिवसेनेच्या वतीन कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. आम्हीच मूळ पक्ष असल्याचा दावा बंडखोर करु शकत नाहीत, पक्षात पडलेली फूट हे दहाव्या सूचीचं उल्लंघन आहे, असा दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे. शिवसेना कोणाची, शिंदे गटाची की मातोश्री गटाची, आमदारांच्या अपात्रतेवर काय होणार, यासारख्या प्रश्नांची उत्तरं आज मिळण्याची शक्यता आहे. न्या. रमण्णा यांच्या पीठासमोर सुनावणी सुरु आहे.

कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद काय?

आम्हीच मूळ पक्ष असल्याचा दावा बंडखोर करु शकत नाहीत. पक्ष फुटल्याचं बंडखोर आमदारांनी आयोगासमोर कबूल केलंय. बंडखोरांनी स्वतःहून मूळ पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्ष सोडल्याचं सदस्यांच्या वर्तनाने सिद्ध झालं आहे. पक्षाच्या बैठकीला जाण्याऐवजी बंडखोर आमदार सुरत, गुवाहाटीला गेले. तिथून त्यांनी गटनेता बदलल्याचं विधानसभा उपाध्यक्षांना कळवलं. घटनेची दहावी सूची याला परवानगी देत नाही. पक्षात फूट हे दहाव्या सूचीचं उल्लंघन आहे, असं सिब्बल म्हणाले.

पक्षांतराला प्रोत्साहन देण्यासाठी दहाव्या सूचीचा वापर केला जात आहे. असं सुरु राहिल्यास कोणत्याही राज्यातील सरकार पाडणं शक्य होईल, असंही सिब्बल म्हणाले. बंडखोर अपात्र असतील, तर आतापर्यंतच्या सर्व प्रक्रिया अवैध ठरतील. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांची नियुक्ती, त्यांचा शपथविधी, नव्या सरकारने घेतलेले सर्व निर्णय अवैध असतील, असं सिब्बल यांनी सुचवलंय.

हेही वाचा : कर्करोगाशी झुंजणाऱ्या लढवय्याशी मुख्यमंत्र्यांची भेट, डॉ. प्रकाश आमटेंची शिंदेंकडून विचारपूस

दोन तृतीयांश आमदार असतील, तर ते दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात किंवा नवा पक्ष स्थापन करु शकतात, असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं असता, तुमच्या म्हणण्यानुसार त्यांनी भाजपमध्ये विलीन व्हावं किंवा नवा पक्ष स्थापन करावा का? असं कोर्टाने विचारलं, तेव्हा, त्यांच्यासाठी केवळ हाच बचाव शक्य आहे, असं उत्तर सिब्बल यांनी दिलं.

हेही वाचा : उद्धव ठाकरे आता शेवटचा ‘एक्का’ वापरणार? तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत

बंडखोरांनी दुसऱ्या पक्षात विलीन होणं हाच पर्याय आहे, मोठ्या गटाने पक्षांतर करणं हे घटनात्मक पाप आहे, बंडखोर पक्षावर दावा सांगू शकत नाहीत, असं म्हणत ठाकरे गटाच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी कोर्टात सांगितलं.

हेही वाचा : आक्रमक ओबीसी चेहरा शिवसेनेच्या भात्यात, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणारSource link

Leave a Reply

Your email address will not be published.