१० जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास शकील शेख दुकानात काम करीत होते. त्यावेळी दोन ते तीन अनोळखी व्यक्ती दुकानावर आले व आज दुकान बंद ठेवा असे म्हणून निघून गेले. परंतु दुकानात ग्राहक असल्याने शेख यांनी दुकान सुरुच ठेवले. त्यानंतर १२ जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास शेख यांच्या मोबाईलमधील पाचपीर बाबा दरगाह कमेटी नावाच्या ग्रुपवर सिराज शेख या व्यक्तीने एक पोस्ट केलेही दिसली.
क्लिक करा आणि वाचा- लाल किल्ल्यावर पाकिस्तानच्या झेंड्यासारखा झेंडा फडकतानाचा व्हिडिओ, युवकाला अटक
शकील शेख यांना दुकान बंद ठेवण्याबाबत सांगून सुध्दा त्यांनी दुकान चालू ठेवून आमच्या भावना दुखावल्या आहेत. असा मेसेज होता. त्याखाली अझीम राजे, राऊफ खान साहब यांनी मेसेज करून शिरच्छेद करण्याची धमकी दिली. तसेच वाहिद सय्यद, गफार शेख, तन्वीर शेख यांनी दुकानावर बुलडोजर चालवू अशी धमकी दिली. त्यानंतर शकील शेख त्या ग्रुपमधून बाहेर पडले.
क्लिक करा आणि वाचा- विखे पाटलांकडून पुन्हा अजित पवारांचे कौतुक; आघाडी सरकारवर निशाणा
त्यानंतर १३ जूनला दुपारी शेख हे त्यांच्या सलुनमध्ये असताना दोघे जण एका दुचाकीवरून तोंडाला काळे कापड आले. त्यांनी हातातील लाकडी व लोखंडी दांडक्याने शेख यांच्या दुकानाच्या समोरील भागात लावलेले काचेचे गेट फोडून, तुम्ही मुसलमान नाही, आज दुकान फोडले, उद्या तुला फोडू अशी धमकी देऊन निघून गेले, असे फिर्यादी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘बालविवाहासाठी फक्त सरपंचच का? अधिकारी, आमदारांनाही जबाबदार धरा’; सरपंच परिषदेने सरकारला सुनावले
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक संपत शिंदे तपास करीत आहेत.