चुकीची आहारशैली आणि आळशी व सुस्त जीवनशैली यांमुळे बद्धकोष्ठता (constipation) ही गंभीर समस्या उद्भवू शकते. पूर्वीच्या काळातील लोकांचे जीवन हे खूप सुदृढ होते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. योग्य वेळी योग्य आहार, चांगल्या सवयी यांमुळे तेव्हा बद्धकोष्ठता ही समस्या केवळ नावाला होती. पण आता जसा काळ बदलला आहे तशा लोकांच्या खाण्याच्या आणि जगण्याच्या सवयी सुद्धा बदलल्या आहेत आणि म्हणूनच बद्धकोष्ठता ही एक मोठी समस्या म्हणून नावारूपाला आली आहे. तुम्हाला प्रत्येक घरात बद्धकोष्ठतेचा एक तरी रुग्ण हमखास मिळेल.

अनेक जण ही एक सामान्य समस्या आहे म्हणून याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करतात पण असे अजिबात करू नका. जर तुम्ही बद्धकोष्ठता सामान्य समस्या आहे म्हणून लक्ष दिले नाही तर पुढे जाऊन यातूनच मुळव्याध, लठ्ठपणा, थकवा आणि कमजोरी येणे यांसारख्या समस्या उद्भवतील आणि मग तेव्हा उपचारांवर सुद्धा बक्कळ पैसा खर्च करावा लागेल तरीही कायमस्वरूपी उपाय मिळणार नाही.

काय हे बद्धकोष्ठता?

सर्वात आधी आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया की नक्की बद्धकोष्ठता आहे तरी काय? जेव्हा तुमचे मल मलाशयामधून पास होत नाही, मल कडक असते किंवा मल त्याग करताना समस्या निर्माण हिते, वेदना होतात किंवा अगदी थोडेस मल बाहेर पडते तेव्हा या सर्व स्थितीलाच बद्धकोष्ठता असे म्हणतात. आपण जे खातो त्यातील अतिरिक्त पदार्थांचे मल तयार होते आणि हे मल वेळीच शरीराबाहेर पडणे महत्त्वाचे आहे. कारण यामध्ये खूप जीव जंतू असतात. जर हे मल बाहेरच पडले नाही तर पोटात आणि आतड्यात विषारी तत्वे जमा होऊ लागतात.

(वाचा :- Gut Health Tips : बापरे, तुमच्याच या भयंकर चुकांमुळे आतडी सुकू लागतील व पिळ बसू लागेल, डॉक्टरांचा कडक इशारा.!)

बद्धकोष्ठता आणि आयुर्वेद

आयुर्वेद म्हणते की बद्धकोष्ठता म्हणजे पोटात जो अग्नी आहे त्यात काहीतरी गडबड आहे आणि हीच गडबड आयुर्वेदिक उपचाराने ठीक सुद्धा होऊ शकते. आयुर्वेदाच्या डॉक्टर रेखा राधामणी म्हणतात की, त्यांच्याकडे रुग्ण तक्रारी घेऊन येतात की कोणत्याही कारणाशिवाय डोके दुखते आहे, तोंडावर खूप फोड्या येत आहेत, तर ह्या सर्व समस्या सुद्धा बद्धकोष्ठतेमुळेच झालेल्या असतात. आयुर्वेदानुसार जर एक दिवस सुद्धा तुमचे मल पास झाले नाही तर पोटासाठी खूप नुकसानदायक ठरू शकते. चला जाणून घेऊया आयुर्वेद ह्या बद्धकोष्ठतेवर काय उपाय सांगते.

(वाचा :- आयुष्यभर डायबिटीज होऊ नये व असेल तर वाढू नये म्हणून चुकूनही खाऊ नका ‘हे’ 7 पदार्थ, झपाट्याने वाढेल ब्लड शुगर..)

सुखा आलुबुखारा

आयुर्वेदाच्या डॉक्टर रेखा राधामणी यांच्या म्हणण्यानुसार, रात्री झोपण्याआधी 5 ते 6 वाळलेले सुखे आलूबुखारा पाण्यात भिजत ठेवा. आणि सकाळी उठल्यावर पहिले उपाशी पोटी हे आलूबुखारा खा आणि त्यानंतर ते ज्या पाण्यात भिजत ठेवले होते ते पाणी प्या. यामुळे नक्कीच फायदा होतो आणि कडक शौच नरम पडून पास होण्यास मदत होते. आयुर्वेदामधील हा एक सोप्पा पण तेवढाच रामबाण इलाज आहे ज्यामुळे अनेकांना फायदा मिळाल्याची सुद्धा माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास आवर्जून हा उपाय करून पहा.

(वाचा :- Hepatitis A,B,C,D,E काय आहे? लिव्हर खराब करणा-या जीवघेण्या आजाराचा धोका या लोकांना जास्त, डॉक्टरांचा कडक इशारा)

खूप पाणी प्या

बद्धकोष्ठतेचा ही अत्यंत गंभीर समस्या आहे आणि यापासून तुम्हाला स्वत:चा बचाव करायचा असेल तर खूप जास्त प्रमाणात पाणी पिण्याची सवय लावून घ्या. तुम्ही रोज किमान सात ते आठ ग्लास तरी पाणी प्यायला हवे. शरीराला हायड्रेटेड राखण्यासाठी हे गरजेचे आहे असे डॉक्टर सांगतात. बघा मंडळी, किती सोप्पा उपाय आहे. म्हणजे तुम्हाला वेगळे काही करण्याची देखील गरज नाही. तुम्हाला फक्त पाणी प्यायचे आहे आणि तुमचा बद्धकोष्ठते पासून बचाव होईल.

(वाचा :- हार्ट फेल, हार्ट अटॅक, रक्ताच्या नसा ब्लॉक करतं कोलेस्ट्रॉल, या 2 भागांत होतात खूप वेदना, लगेच करा ही 4 कामं)

एक्सरसाइज सुद्धा आहे गरजेचं

हे सगळे उपाय तर कराच पण सोबतच रोज व्यायाम करणे सुद्धा महत्त्वाचे आहे असे डॉक्टर सांगतात. ज्या व्यक्ती व्यायाम करतात त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास जास्त सतावत नाही. यामुळे पोटातील अग्नी शांत राहतो आणि पचनक्रिया देखील सुधारते.

(वाचा :- या गंभीर चुका करणा-या लोकांना होतो फुफ्फुसांचा कॅन्सर, या 5 पद्धतींनी करा फुफ्फुसांतील घाण व विषारी घटक साफ)

दुध आणि तूप प्या

जर तुम्ही तुमच्या आहारात गुड फॅटचा समावेश केला तर तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून मोठा आराम मिळू शकतो. हा बद्धकोष्ठतेवर एक जालीम उपाय आहे. रोज रात्री झोपण्याच्या आधी एक ग्लास दुधात अर्धा चमचा तूप टाकून प्या. बघा तुम्हाला स्वत:ला खूप जास्त फरक दिसेल.

(वाचा :- या मराठमोळ्या तरूणाने ही 1 ट्रिक वापरून फक्त 5 महिन्यात घटवलं तब्बल 20 किलो वजन, फोटो बघून व्हाल हैराण..!)

सुंठ किंवा सुकं आलं

डॉक्टरांच्या मते, सुकं आलं किंवा सुंठ लॅक्सिटिव्ह (laxatives) म्हणून काम करते. रोज सकाळी एक ग्लास गरम पाण्यात सुंठ पावडर टाकून प्यायल्याने अनेक फायदे मिळू शकतात.

(वाचा :- पोट, कंबर, मांड्यावरील चरबी झपाट्याने जाईल साखरेसारखी विरघळून, हा 1 पदार्थ या 5 पद्धतींनी खा, लगेच मिळेल रिझल्ट)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

बद्धकोष्ठतेसाठी आयुर्वेदिक उपाय..!

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.