सांगली: बलात्कार करून एका महिलेचा निर्घृण खून करून विवस्त्र अवस्थेमधील तिचा मृतदेह फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार इस्लामपूर नजीकच्या वाघवाडी याठिकाणी समोर आला आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी इस्लामपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

इस्लामपूर शिवपुरी रोडवरील बांदल मळ्यात आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान एका मोकळ्या शेतात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती इस्लामपूर पोलिसांना मिळाली. इस्लामपूर पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतातील लिंबाच्या झाडाखाली महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला. महिलेचे तोंड मातीमध्ये दाबून ओढणीने गळा आवळला होता. यामध्ये महिलेच्या मानेचे हाड पूर्णपणे मोडले होते. पोलिसांनी जलद गतीने तपास यंत्रणा कामाल लावली आहे. हा खून अनैतिक संबंधाच्या कारणातून झाला असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

हेही वाचा –डोंबिवली हादरली, ६४ वर्षीय सुरक्षा रक्षकाची हत्या, डोक्यावर, चेहऱ्यावर वार

मृतदेहाजवळील वायरच्या पिशवीमध्ये एक साडी, परकर, टॉवेल मिळून आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडलेली असावी असा अंदाज वेक्त केला जात आहे. यावरून इस्लामपूर पोलिसांत बलात्कार करून खून केल्याचा अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून उत्तरीय तपासासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा –गळफास लावून बारावीच्या विद्यार्थिनीनं सेल्फी काढला; प्रियकराला पाठवून केली आत्महत्या

सात हजार दिले नाही म्हणून चक्क बॉम्बच ठेवला दुकानापुढेSource link

Leave a Reply

Your email address will not be published.