उस्मानाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष तथा फक्राबादचे सरपंच नितिन अंकुश बिक्कड यांच्यावर परवा रात्री गोळीबार झाला होता. आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. सदरील गोळीबार हा पवनचक्की टेंडरसाठी झाला असावा असं नितिन बिक्कड यांनी पुरवणी जबाबात म्हटलं आहे. दिल्ली येथील रेन्यू सुर्या रोशनी कंपनी यांचे उस्मानाबाद जिल्हयात पवनचक्कीचे काम चालू आहे. जिल्हयातील चांदवड, घाटपिंप्री येथे प्लँन्ट चालू होणार असल्यामुळे मला तेथे भागिदारीत काम करायचे होते म्हणून कंपनीचे के. राजा कुमार कंपनीचे व्हेंडर कुलदिप देशमुख यांना संपर्क केला होता. दरम्यान, हा गोळीबार याच कारणामुळे झाला असावा असा संशय नितिन बिक्कड यांनी पुरवणी जबाबात व्यक्त केला आहे.

गुन्ह्याची पार्श्वभूमी…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील फक्राबादचे सरपंच नितिन बिक्कड यांच्यावर परवा रात्री गोळीबार करण्यात आला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून नितिन बिक्कड यांनी गाडी जोरात चालवल्याने मोठा अनर्थ टळला. काल रात्री फक्राबादचे सरपंच नितिन बिक्कड हे पेट्रोल पंपाविषयी बोलणी करण्यासाठी पारा येथील संपर्क कार्यालयाकडे गाडी एम एच २५ ए डब्लु ६८६८ या गाडीने जात होते. त्यांची गाडी फक्राबाद शिवारातील २ अनोळखी व्यक्तींनी हात दिला त्यातला एकाने तोंडाला रुमाल बांधला होता तर दुसऱ्याने मास्क लावले होते.

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी सरकारचे मोठे पाऊल; सुमारे नऊ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी
काही तरी काम असेल म्हणून बिक्कड यांनी गाडीचा स्पिड कमी केला असता तोच पाठीमागे बसलेला मास्क लावलेल्या एकाने त्यांच्या जवळील छोटी बंदुक काढली आणि नितिन बिक्कड यांच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी गाडीच्या समोरील काचावर लागली, हे लक्षात येताच नितिन बिक्कड यांनी गाडीचा स्पिड वाढवला आणि त्यांनी त्यांची गाडी पुढे पळवली. त्यानंतर पुन्हा दुसरी गोळी झाडली ती गाडीच्या पाठीमागे लागली असून नितिन बिक्कड घाबरलेल्या अवस्थेत पारा येथील चौकात आले. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार त्यांनी पोलिसांना फोन करुन सांगितला. यादरम्यान, बी पी वाढल्याने बिक्कड हे पारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाले.

पुढील आठवड्यात ‘या’ धमाकेदार स्मार्टफोन्सची होणार भारतात एंट्री, पाहा लिस्टSource link

Leave a Reply

Your email address will not be published.