मुंबई: बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. पहिल्या तीन सीझनला प्रेक्षकांनी दिलेल्या तुफान प्रतिसादानंतर आता कलर्स मराठीने या शोच्या चौथ्या पर्वाची घोषणा केली आहे. बिग बॉस शो गाजतो तो त्यातील स्पर्धक कलाकारांमुळे. त्यामुळे या शोच्या चौथ्या पर्वात कोणते कलाकार दिसणार याची उत्सुकता तर प्रेक्षकांना असतेच, पण येत्या पर्वाचा सूत्रसंचालक कोण होणार या चर्चेला उधाण आलं आहे. त्याचं कारणही तसच आहे. पहिल्या तीन पर्वाचे होस्ट महेश मांजरेकर यांनी थांबायचं ठरवल्याने बिग बॉसची टीम नव्या होस्टच्या शोधात आहे.

बिग बॉस बनून स्पर्धकांना टास्क देणारा, त्यांच्या वागण्यावर लक्ष ठेवणारा लगाम म्हणजे या शोचा निवेदक, सूत्रसंचालक, होस्ट. या भूमिका आजवरच्या तीन पर्वात महेश मांजरेकर यांनी बजावल्या. त्यामुळे बिग बॉस मराठी म्हणजे महेश मांजरेकर हे समीकरणही घट्ट झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या सीझन ४ ची तयारी सुरू होती, पण या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार नाही असे संकेत दिसायला लागले. आता तर हे पक्कं आहे की मांजरेकर यांनी हा करार थांबवला आहे.

एकीकडे बिग बॉसची टीम बिग बॉसच्या घरातील स्पर्धक निवडत असताना सूत्रसंचालक म्हणून कुणाला घ्यायचे याचीही तयारी करत आहेत. महेश मांजरेकर यांनी ही जबाबदारी पुढे चालवण्यासाठी नकार दिल्यानंतर पहिल्यांदा नाव आलं ते अभिनेता सिध्दार्थ जाधव. सिध्दार्थशी बोलणी सुरू होती, मात्र पुढे निर्णय झाला नाही. सिध्दार्थच्या हातात सध्या काही सिनेमे असल्याने कदाचित त्याने ही ऑफर स्वीकारली नसावी.

सिध्दार्थ जाधवनंतर बिग बॉसच्या सूत्रसंचालकपदासाठी नाना पाटेकर यांचंही नाव चर्चेत आलं होतं. पण नाना पाटेकर यांनी ही ऑफर नाकारली. नानांनी नकार देण्यामागचं कारण अजून स्पष्ट झालं नाही. तरी बिग बॉसच्या टीमने नाना यांना पुन्हा ही ऑफर दिल्याची बातमी आहे. मात्र नाना त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याने पुन्हा एकदा होस्टचा शोध सुरू झाला.

आता बिग बॉसच्या टीमने होस्टसाठी दोन सेलिब्रिटी कलाकारांची नावं शोधली आहेत. यामध्ये एक आहे ते प्रख्यात दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दुसरा आहे अभिनेता अंकुश चौधरी. धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव मोहिते या सिनेमामुळे सध्या जोरदार चर्चेत असलेल्या प्रवीण तरडे यांनी बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन करण्याची ऑफर दिली आहे. अजून त्यांनी त्यांचा निर्णय सांगितला नसला तरी प्रवीण तरडे यांच्या चाहत्यांसाठी ही गोड बातमी आहे.

अंकुश चौधरी याचेही नाव होस्ट म्हणून चर्चेत आहे. मी होणार सुपरस्टार या रिअॅलिटी शोचा परीक्षक म्हणून तो दिसला आहे. शिवाय दुनियादारी, दगडी चाळ, डबलसीट, गुरू यासह अनेक सिनेमातील त्याच्या भूमिकांनी मनोरंजन केलं आहे. पण आता बिग बॉसचा होस्ट म्हणून जर अंकुश दिसला तर त्याच्या चाहत्यांना ट्रीटचSource link

Leave a Reply

Your email address will not be published.