नवी दिल्ली: Free Data Plans: Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea कायमच ग्राहकांसाठी नव-नवीन प्लान्स ऑफर करत असतात. या कंपन्यांकडे असे अनेक रिचार्ज प्लान्स उपलब्ध आहेत. जे वेगवेगळ्या किंमतींमध्ये येतात. सहसा अधिक इंटरनेट असलेल्या प्लान्ससाठी युजर्सना अधिक पैसे खर्च करावे लागतात . पण, आज आम्ही तुम्हाला Vodafone Idea च्या अशाच एका रिचार्जबद्दल सांगणार आहो. ज्याच्या मदतीने रात्रभर मोफत इंटरनेट वापरू शकता. या दरम्यान युजर्सना हाय स्पीड इंटरनेट डेटा मिळेल. ज्याला कोणतीही मर्यादा नाही. Hero Unlimited या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉल्स, २८ दिवसांची वैधता देखील मिळेल. Hero Unlimited ऑफरची सुरुवातीची किंमत २९९ रुपये आहे.

वाचा: Top Smartphones: फीचर्सच्या बाबतीत महागडे स्मार्टफोन्स सुद्धा फेल, हेवी बॅटरीसह येणाऱ्या ‘या’ स्मार्टफोन्सची किंमत ८ हजारांपेक्षा कमी

Vodafone Idea Hero Unlimited चे फायदे :

Vodafone Idea चे अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. जे वेगवेगळ्या फायद्यांसह येतात. पण, २९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये यूजर्सना २८ दिवसांची वैधता मिळते. यामध्ये युजर्सना दररोज १.५ GB इंटरनेट डेटा आणि अनलिमिटेड कॉल मिळतात. तर, रात्रीच्या वेळी अमर्यादित इंटरनेट सुविधा मिळते. ही Bing ऑल नाईटची सुविधा आहे. यामध्ये वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा देण्यात आली आहे.

वाचा: 5G Service India: भारतात ‘या’ शहरांमध्ये सर्वप्रथम मिळणार 5G सेवा, किंमत असेल कमी, पाहा डिटेल्स

बिंज ऑल नाईट डेटा प्रोग्राम :

बिंज ऑल नाईट डेटा प्रोग्राम अंतर्गत, युजर्स रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत इंटरनेट डेटा वापरू शकतात. या दरम्यान, तुम्ही वेब सीरिज डाउनलोड करण्यापासून YouTube च्या ऑफलाइन डाउनलोडचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, Vodafone-Idea युजर्सना V Movie आणि TV वर मोफत प्रवेश देखील मिळतो.

VI कडे कमी किमतीत देखील प्लान्स उपलब्ध आहेत. Vodafone Idea चा ९९ रुपयांचा प्रीपेड कमी बजेट असलेल्या युजर्ससाठी एक उत्तम पर्याय आहे. हा प्लान २०० MB डेटा आणि २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. याच्या इतर फायद्यांमध्ये ९९ रुपयांचा टॉकटाइम ( २.५ पैसे प्रति सेकंद दराने कॉलसह फक्त ६६ मिनिटे) समाविष्ट आहे. एसएमएसचा कोणताही फायदा नाही.

वाचा: Smartphone Heating : तुमचा स्मार्टफोन देखील वारंवार गरम होत असेल तर वेळीच द्या लक्ष , अन्यथा होईल मोठे नुकसानSource link

Leave a Reply

Your email address will not be published.