मुंबई : सध्या बाॅलिवूडमध्ये एकापाठोपाठ गुड न्यूज ऐकायला मिळत आहेत. कोण आई होणार, कोण लग्न करणार, असं बरंच काही छान चाललं आहे. त्यात आता भर पडलीय अभिनेत्री बिपाशा बासूची. सूत्रांच्या माहितीनुसार बिपाशा बासू गरोदर आहे. तिच्या लग्नाला ६ वर्ष झाली आहेत. लवकरच ती आणि तिचा पती करण सिंह ग्रोव्हर बाळाचे आई-वडील होणार आहे.

PHOTOS: अनन्या पांड्ये आणि विजय देवरकोंडानं पकडली मुंबई लोकल

अजून तरी बिपाशा आणि करणनं हे अधिकृत घोषित केलेलं नाही. पण आमच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आता चाहते याची अधिकृत घोषणा कधी होत आहे, याची वाट पहात आहेत.

करण आणि बिपाशाने २०१६ मध्ये लग्न केलं होतं. बिपाशाचं हे पहिलं लग्न आहे, तर करणचं हे तिसरं लग्न आहे. करणने २ डिसेंबर २००८ मध्ये पहिलं लग्न श्रद्धा निगमशी केलं होतं, मात्र अवघ्या १० महिन्यांतच हे नातं संपुष्टात आलं. यानंतर करण पुन्हा एकदा प्रेमात पडला आणि यावेळी त्याने टीव्ही जगतातील सर्वात सुंदर अभिनेत्री मानल्या जाणार्‍या जेनिफर विंगेटशी लग्न केलं. ९ एप्रिल २०१२ रोजी करणने जेनिफरशी लग्न केलं, परंतु करणचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही आणि २०१४ मध्ये दोघंही वेगळे झाले.

सखी गोखलेच्या टॅटूमागचं कारण वाचलंत तर डोळ्यात पाणी येईल!

करण आणि बिपाशाची भेट अलोन सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना काही एकटं सोडलं नाही. ३० एप्रिल २०१६ मध्ये दोघांचं लग्न झालं. ७ जानेवारीला बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू ने तिचा ४३ वा वाढदिवस साजरा केला. बिपाशाच्या वाढदिवसासाठी पती करण सिंह ग्रोवरने खास व्यवस्था केली होती. या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ बिपाशाने सोशल मीडियावर शेअर केले होते.

शाहरुख- कतरिनाचे सिनेमेSource link

Leave a Reply

Your email address will not be published.