राजकोट : खेळाडूला वयाचं बंधन नसतं, हे दिनेश कार्तिकने आजच्या सामन्यात दाखवून दिले. युवा खेळाडूंना लाजवेल अशी तुफानी फलंदाजी आज कार्तिकने करून दाखवली. कार्तिकच्या भन्नाट अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाला यावेळी धावांचा डोंगर उभारता आला. कार्तिकच्या अर्धशतकाच्या जोरावर यावेळी भारताला दक्षिण आफ्रिकेपुढे १७० धावांचे आव्हान ठेवता आले. कार्तिकने यावेळी २७ चेंडूंत ९ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५५ धावांची वादळी खेळी साकारली.

दक्षिण आफ्रिकेने यावेळी टॉस जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. सामना सुरु होण्यापूर्वी पाऊस पडला होता आणि त्याचाच फायदा दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी उचलल्याचे पाहायला मिळाले. भारताला सलामीवीर ऋतुराजच्या रुपात पहिला धक्का बसला, त्याला पाच धावाच करता आल्या. आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यात श्रेयस अय्यर अपयशी ठरला होता. त्यामुळे या सामन्यात तो कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण श्रेयस पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि त्याला फक्त चार धावाच करता आल्या. एकिकडे भारताच्या दोन विकेट्स पडल्या असल्या तरी इशान किशन मात्र खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. इशानच्या खांद्यावर भारताच्या धावगतीची जबाबदारी होती. पण इशान २७ धावांवर बाद झाला आणि भारताची धावगती मंदावली. त्यानंतर मैदानात रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या हे कर्णधार व उपकर्णधार खेळत होते. ही जोडी भारताला मोठी धावसंख्या उभारून देईल असे वाटत होते. पण मोठा फटका मारण्याच्या नादात इशानचा झेल उडाला. पण केशव महाराजने त्याचा झेल सोडला आणि त्याला १५ धावांवर असताना जीवदान मिळाले. पण या जीवदानाचा फायदा पंतला उचलता आला नाही. कारण त्यानंतर पंतने फक्त दोन धावा केल्या आणि १७ धावांवर तो बाद झाला.

पंत बाद झाल्यावर दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्या यांची चांगलीच जोडी जमली. पण हार्दिक बाद झाला आणि ही जोडी फुटली. हार्दिकने यावेळी ३१ चेंडूंत ३ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४६ धावा केल्या. पण यावेळी कार्तिक हा भन्नाट फॉर्मात असल्याचे पाहायला मिळाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.