मुंबई: अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या प्रेग्नन्सीमुळे (Sonam Kapoor Pregnancy) चर्चेत आहे. अभिनेत्री सोनम कपूर आणि तिची बहिण रिया कपूर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Sonam Kapoor Flaunting Baby Bump) झाले होते. ज्यामध्ये सोनम कपूर बेबी बम्प फ्लाँट करताना दिसली आहे. दरम्यान यामुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगची शिकार व्हावं लागलं आहे. अभिनेत्रीचा हा लूक काही नेटिझन्सना आवडला नाही आहे. त्यांनी नकारात्मक कमेंट्स करत अभिनेत्री सोनम कपूर हिला सुनावलं आहे.

अभिनेत्री सोनम कपूर रिहानाची कॉपी (Sonam Kapoor Trolled on Instagram) करत असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. रिहाना देखील सध्या प्रेग्नंट आहे आणि तिने अनेकदा बेबी बम्प फ्लाँट करणारे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिचा हा लूक चाहत्यांना आवडला देखील आहे. मात्र सोनमने असा लूक कॅरी करणं चाहत्यांना आवडलेलं दिसत नाही आहे.

हे वाचा-लग्नाच्या ६ महिन्यांनंतर विकी-कतरिनामध्ये ‘ती’ची एंट्री, अभिनेता म्हणाला- आम्ही केवळ चांगले मित्र

सोनमने यावेळी ट्यूब टॉप घालून त्यावर लाँग जॅकेट कॅरी केले आहे. ज्यामधून ती तिचा बेबी बम्प फ्लाँट करत आहे. या फोटोमध्ये तिच्यासह तिची बहिण देखील आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोवर चाहत्यांनी अशा कमेंट्स केल्या आहेत की, ‘हा नवा ट्रेंड काही चांगला नाही आहे’, ‘विचित्र काहीही करा त्याचा ट्रेंड होतो’, ‘ती रिहानाला कॉपी करतेय’. अशा अनेक नकारात्मक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. काहींनी तिला ‘Wannabe Rihanna’ म्हटलं आहे.


हे वाचा-एआर रेहमानने मुलीच्या रिसेप्शनला दिलं मराठमोळ्या गायिकेला निमंत्रण, Photo Viral

अभिनेत्रीला या फोटोवरुन जरी ट्रोल करण्यात आलं असलं तरी सोनम कपूरचे याआधीही बेबी बम्प फ्लाँट करताना काही फोटो व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी या फोटोंचं कौतुकही केलं आहे. अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सोनम सध्या भारतापासून दूर असली तरी ती तिच्याबद्दलचे प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोनम आणि आनंद यांचं हे पहिलं बाळ असणार आहे. सध्या ती गरोदरपणाचा काळ अनुभवत आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.