मुंबई: ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनाया अर्थात रसिका सुनील (Rasika Sunil Birthday) हिने गेल्यावर्षी १८ ऑक्टोबर रोजी तिच्या लाँग टाइम बॉयफ्रेंडशी लग्न केलं. लॉस एंजलिसमध्ये राहणाऱ्या औरंगाबादकर आदित्य बिलागीने (Rasika Suni Aditya Bilagi) रसिकाने लग्न केल्यानंतर नक्कीच तिच्या अनेक चाहत्यांचा ‘हार्टब्रेक’ झाला होता. कारण त्यावेळी शनायाचं नाव घराघरात पोहोचलं होतं, तिच्या प्रेमात अनेक चाहते होते. आज अभिनेत्रीबाबत सांगण्याचं कारण म्हणजे रसिका आज ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे तिच्या गोव्यात झालेल्या ‘बीच वेडिंग’ची चाहत्यांना पुन्हा एकदा आठवण होत आहे.


जानेवारी २०२० पासून आदित्य आणि रसिका डेट करत होते. त्यावेळी ते लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. तिने त्यानंतर दहा महिन्यांनी त्याला पाहिल्यानंतर एक स्पेशल पोस्टही शेअर केली होती. त्याचवेळी त्यांच्या नात्याला एक वर्षही पूर्ण झाले होते. अभिनेत्रीने लांबलचक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.


सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या या कपलने त्यानंतर त्यांचे नाते सीक्रेट ठेवले नव्हते. अभिनेत्रीने अनेकदा आदित्यसह रोमँटिक फोटोज शेअर केले आहेत. आदित्यसोबतचे रसिकाचे एक बोल्ड फोटोशूटही त्यांच्या लग्नाआधी व्हायरल झाले होते. यामध्ये या जोडीचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना आवडला होता. रसिका-आदित्यच्या या बोल्ड फोटोशूटची विशेष चर्चा झाली होती.


रसिकाचा नवरा आदित्य एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तो एक उत्तम डान्सरही आहे. त्यांचे अनेक डान्स व्हिडिओदेखील व्हायरल झाले आहेत. रसिका सुनीलने त्यांच्या लग्नाविषयीचे विविध अपडेट्सही सोशल मीडियावर शेअर केले होते. गोव्यामध्ये पार पडलेल त्यांचं बीच वेडिंग एखाद्या परीकथेप्रमाणेच होतं. रसिकाने साखरपुडा, संगीत, सप्तपदी या सर्वांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

सर्वाधिक चर्चा तिच्या पिवळ्या साडीतील लूकची झाली होती. गोव्यातील अझाया बीच रिसॉर्टमध्ये या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. त्यावेळी रसिकाने परिधान केलेली पिवळ्या रंगाची नऊवारी चाहत्यांच्या पसंतीस आली होती. या कपलचे बीच वेडिंग लूकही चाहत्यांच्या पसंतीस आले होते. लग्नानंतर रसिका आणि आदित्य मालदीवला हनीमूनसाठी गेले होते. त्यावेळीही या कपलचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. एकंदरित रसिका-आदित्यचे सोशल मीडियावरील फोटोज कपल गोल्स देणारे आहेत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.