मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. या दमदार, शानदार ट्रेलरचं सगळीकडे कौतुक होत आहे. पण एक गोष्ट प्रेक्षकांपासून लपवली आहे. ते एक मोठं सरप्राइज आहे. ते म्हणजे किंग खानची भूमिका. अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र सिनेमात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. त्यात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी राॅय हेही आहेत.

असं म्हणतात, या सिनेमासाठी शाहरुख खाननं २०१९मध्येच १० दिवसांचं शूटिंग पूर्ण केलं होतं. सिनेमात शाहरुख खान कुठल्या भूमिकेत आहे, हे समोर आलं आहे. शाहरुख खान हा एका शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहे.

Disha patani चा बिकिनीतील मिरर सेल्फी पाहून, चाहते म्हणाले,’हॉटनेस ओव्हरलोड!’

सिनेमात पहिल्या ३० मिनिटांत दिसेल शाहरुख खान

असं म्हणतात, शाहरुख खान या सिनेमात एका शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहे. तो एक एनर्जी सोर्स तयार करत आहे. शाहरुखच्या व्यक्तिरेखेला ब्रह्मांडातलं सर्वात शक्तिशाली हत्यार मिळतं. ते म्हणजे, ब्रह्मास्त्र. शाहरुख या सिनेमात ३० मिनिटंच आहे. त्याच्या व्यक्तिरेखेपासूनच ब्रह्मास्त्रचा प्रवास सुरू होतो.

मौनी राॅय खलनायिका
मौनी राॅय या सिनेमात नकारात्मक भूमिकेत आहे. ती शाहरुखच्या व्यक्तिरेखेकडची सगळी शक्ती चोरते. आणि मग सुरू होते ती ब्रह्मास्त्रच्या शोधाचा प्रवास. पृथ्वीवर तीन ठिकाणी ते लपवून ठेवलेलं असतं. म्हणून सिनेमा ३ भागांत असावा.

रणबीर आणि आलियाच्या व्यक्तिरेखा
रणबीर कपूर शिवाच्या भूमिकेत आहे. तर आलिया भट्ट ईशा झालीय. शिवाकडे सुपरपाॅवर आहे. तो शरीरातून आग काढू शकतो. आगीनं तो जळत नाही. आता मौनी राॅयची व्यक्तिरेखा शिवाला ब्रह्मास्त्र मिळू नये म्हणून प्रयत्न करणार. सिनेमात खूप अॅक्शन, व्हिज्युअल ट्रिटमेंट्स पाहायला मिळणार आहेत.

‘आई कुठे काय करते’ मध्ये येणार ट्विस्ट, देशमुख कुटुंबात नव्या पात्राची एंट्री

‘चला हवा येऊ दया साठी ‘कियारा-वरुणचा मेट्रो प्रवासSource link

Leave a Reply

Your email address will not be published.