पारगाव या ठिकाणी प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला आहे. इतकंच नाही तर दरेकर यांच्याविरोधात पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थक पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत दिसून आले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे सध्या बीड दौऱ्यावर आहेत. मात्र, या दौऱ्यादरम्यान बीड-उस्मानाबाद सीमेवर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांचा ताफा अडवत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. सध्या बीड जिल्ह्यात पंकजाताई यांना भाजपने डावलल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष पहायला मिळतोय.
भाजपमध्ये पंकजा मुंडेंवर सतत होणारा अन्याय पाहता पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र, आज प्रवीण दरेकर हे बीड दौऱ्यावर असताना उस्मानाबाद बीड सीमेवर त्यांचा ताफा अडवून भाजप विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.
औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे समर्थकांचं भाजप कार्यालयावर आंदोलन