पुणे: राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या गटातील एक मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांना मिळाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. प्रफुल्ल पटेल यांना सुरक्षित करायच्या नादात राष्ट्रवादीने त्यांच्यासाठी जास्त मतांचा कोटा राखून ठेवला. ही मतं शिवसेनेच्या संजय पवार यांना देता आली नसती का, असा प्रश्न शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवा यांनी हा खुलासा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांना मिळालेल्या अतिरिक्त मतांपैकी एक मत हे शिवसेनेला ट्रान्स्फर होऊच शकलं नसतं. कारण, विरोधकांच्या गटातील एका आमदाराने मला सांगून प्रफुल्ल पटेल यांना मत दिले होते. मी राष्ट्रवादीला मत देणार असल्याचे त्यांनी मला सांगितले होते. भाजपच्या गटात असे अनेक लोक आहेत की, ज्यांच्यासोबत मी कधीकाळी काम केले आहे. मी एखादा शब्द टाकला तर नाही बोलायची त्यांची तयारी नसते. पण मी या सगळ्यात पडलो नाही. तरीही विरोधी गटातील एका आमदाराने स्वत:हून राष्ट्रवादीला मतदान केले. हा आमदार भाजपचा नसून अपक्ष आहे. पण तो भाजपच्या गटातील आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. ते शनिवारी सकाळी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (NCP get one MLA vote from BJP Quota says Sharad Pawar)

राज्यसभा निवडणुकीचा निकाल पहाटे चार वाजता जाहीर झाला. यामध्ये सहाव्या जागेवरील लढतीमध्ये भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांच्यावर मात केली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शरद पवार यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात भाष्य करताना म्हटले की, अपक्षांना आपल्या बाजूने वळविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला आहे. अपक्ष आमदार आपलीशी करण्यात विरोधी फडणवीस यांना यश आलं. राज्यसभा निकालाने मला कोणताही धक्का बसलेला नाही. महाविकास आघाडीच्या एकूण संख्येप्रमाणे मतदान झालं. तिन्ही पक्षातील एक मतंही फुटलं नाही. जी मतं फुटली आहेत, ती अपक्षांची आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले.

सरकार सुरक्षित आहे, पुरेसे संख्याबळ आहे: पवार

राज्यसभा निवडणुकीच्या निकालामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर होईल, हा दावा शरद पवार यांनी फेटाळून लावला. महाविकास आघाडीचे एकही मत फुटलेले नाही. त्यामुळे सरकार चालवण्यात कुठलाही धोक नाही. एक-दोन मतं इकडे-तिकडे झाली. भाजपला दोन नंबरची जादा मतं मिळाली. जी काही गंमत झाली ती सगळी अपक्षांच्या लॉटमध्ये झाली, असे शरद पवार यांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.