इंदूर : केंद्र सरकारनं भारतीय सैन्य दलातील भरतीसाठी अग्निपथ योजना जाहीर केली आहे. अग्निपथ योजना जाहीर झाल्यानंतर भारतातील आठ राज्यांमध्ये मोठा विरोध करण्यात आला. बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पंजाब, हरियाणा, तेलंगाणामध्ये या योजनेला तरुणांनी मोठा विरोध केला. केंद्र सरकारनं या योजनेमध्ये तरुणांच्या विरोधानंतर बदल केले. भाजप नेत्यांकडून ठिकठिकाणी अग्निपथ योजनेच्या समर्थनार्थ मांडणी केली जात आहे. इंदूरमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव कैलाश विजयवर्गीय यांच्या एका वक्तव्यामुळं भाजपची अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजप कार्यलयात सुरक्षारक्षक ठेवतो त्यामुळं आम्ही अग्निवीरांना प्राधान्य देऊ, असं विजयवर्गीय म्हणाले.

कैलाश विजयवर्गीय यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काँग्रेस, आम आदमी पक्षानं भाजप आणि विजयवर्गीय यांच्यावर टीका केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत देशाचा आणि विद्यार्थ्यांचा अपमान करुन नका असं म्हटलं आहे. आपल्या देशातील युवक दिवस रात्र मेहनत करतात, शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात कारण त्यांना सैन्य दलात जाऊन आयुष्यभर देशसेवा करायची असते. भाजपच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा रक्षक होण्यासाठी ते मेहनत करत नाहीत,असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
फडणवीसांची मर्जी, दरेकरांची सरशी, दिग्गजांना डावलून विरोधी पक्षनेते बनले, वाचा राजकीय कारकीर्द…

बिहार आणि उत्तर प्रदेश प्रमाणं अग्निपथ योजनेला मध्य प्रदेशमध्ये देखील विरोध करण्यात आला आहे. भाजपच्यावतीनं कैलाश विजयवर्गीय यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. कैलाश विजयवर्गीय अग्निपथ योजनेचे फायदे सांगताना अग्निपथ योजनेद्वारे अग्निवीर म्हणून काम करुन परतल्यावर त्याच्या हातात ११ लाख त्याच्या हातात असतील. मला भाजपच्या या कार्यालयात सुरक्षारक्षक ठेवायचा असेल तर मी अग्निवीराला प्राधान्य देईन, असं विजयवर्गीय म्हणाले.

मतांसाठी धावाधाव, एकनाथ खडसे किंगमेकर हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला
कैलाश विजयवर्गीय यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी टीका केली आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी अग्निपथ योजनेसंदर्भातील सगळ्या शंका दूर केल्याचं काँग्रेसनं म्हटलं. अग्निपथ योजनेविरोधातील सत्याग्रह याच मानिसकतेच्या विरोधात असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. प्रशांत भूषण आणि समाजवादी पक्षानं देखील विजयवर्गीय यांच्यावर टीका केली आहे. कैलाश विजयवर्गीय वादग्रस्त वक्तव्यामुळं यापूर्वी देखील चर्चेत आले होते. कैलाश विजयवर्गीय यांच्या वक्तव्यावर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
भाडोत्री सैन्य हा काय प्रकार? असंच जर असेल तर भाडोत्री राज्यकर्ते आणा, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल 92205010Source link

Leave a Reply

Your email address will not be published.