विशाखापट्टणम : भारताने तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. भारताने दमदार फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी १८० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला भारताने एकामागून एक धक्के दिले आणि ४८ धावांनी विजय साकारला. या मैदानात आतापर्यंत प्रथम फलंदाजी करताना कोणत्याही संघाला विजय मिळवता आला नव्हता. पण भारताने ही गोष्ट मोडून काढली आणि इतिहास रचला.

भारताने टॉस गमावला असला तरी त्यांनी दोन्ही सलामीवीरांनी धडाकेबाज सुरुवात करून दिली. ऋतुराजने पाचव्या षटकात तब्बल पाच चौकार लगावले आणि २० धावांची लूट केली. पहिल्या पॉवर प्लेमध्ये भारताने धडाकेबाज फटकेबाजी करत एकही विकेट गमावली नाही. भारताने पहिल्या पॉवर प्लेमध्ये यावेळी बिनबाद ५७ अशी मजल मारली. भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने या सामन्यात दमदार अर्धशतक झळकावले. ऋतुराजने तिसऱ्या सामन्यात भन्नाट फटकेबाजी के ल्याचे पाहायला मिळाले. ऋतुराजने ३० चेंडूंमध्ये आपले पहिले ट्वेन्टी-२० अर्धशतक पूर्ण केले. पणअर्धशतकानंतर मात्र ऋतुराजला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. ऋतुराज गायकवाडच्या रुपात भारतीय संघाला पहिला धक्का बसला. ऋतुराजचे हे पहिले ट्वेन्टी-२० अर्धशतक ठरले. ऋतुराज बाद झाल्यावर इशानने दमदार फलंदाजी केली आणि ापले या मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर इशानला जास्त काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. इशानने यावेळी ३५ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५४ धावा केल्या. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनंतर भारताला एकामागून एक धक्के बसत गेले. श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांना मोठी खेळी साकारता आली नाही. हार्दिक पंड्याने यावेळी नाबाद ३१ धावा करत संघाला १७९ धावांपर्यंत मजल मारून दिली.

भारताच्या १८० धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीपासूनच धक्के द्यायवा सुरुवात केली. भारताच्या युजवेंद्र चहलने यावेळी २० धावांत तीन बळी मिळवत भाारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. चहलला यावेळी हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांच्याकडून सुयोग्य साथ मिळाली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.