भारतीय वायुदलाने ब्रह्मोस सुपरसोनिक क्रुज क्षेपणास्त्राचे अपग्रेड व्हर्जनची बंगालच्या खाडीत यशस्वी चाचणी केली आहे. या नव्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ४५० किमीपर्यंत वाढवण्यात आली आहे. विषेश म्हणजे, ब्राह्मोसच्या या क्षेपणास्त्राची भीती पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ यांनाही वाटते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ही भीती बोलून दाखवली होती.

अचूक लक्ष्य वेधणार

भारताचे सुखोई लढाऊ विमान अवकाशात विनाइंधन १५०० किमीपर्यंत अचूक लक्ष वेधू शकते. पण या नवीन क्षेपणास्त्रामुळं लढाऊ विमान २ हजार किमीपर्यंत मारा करु शकते. त्यामुळं आता भारतीय हवाईदल भूमी आणि समुद्रातही अचूक लक्ष्य वेधू शकते.

आणखी एक व्हेरियंट लाँच होणार

ब्राह्मोस मिसाईलच्या सहाय्याने शत्रूंची महत्त्वाची ठिकाणे, परमाणू बंकर, कमांड अँड कंट्रोल सेंटर, समुद्रातील एअरक्राफ्ट कॅरिअर आणि युद्धजन्य परिस्थितीत अचूक नेम साधण्यास मदत होईल. ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे आणखी एक व्हेरिंयट तयार केले जात असून त्यांची क्षमता ८०० किमीपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

भारताची ताकद वाढणार

भारताने चीनच्या सीमेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात केली आहेत. भारताने लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष ताबा नियंत्रण रेषेजवळ अनेक महत्त्वाच्या रणनितीक ठिकाणी ब्राह्मोस क्षेपणास्त्र तैनात केली आहेत. गेल्या अडीच महिन्यांत भारताने रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम -१ यासह अनेक क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. रुद्रम-वन ही क्षेपणास्त्र २०२२ पर्यंत सेवेत दाखल होण्याती शक्यता आहेSource link

Leave a Reply

Your email address will not be published.