नवी दिल्ली : सूर्यकुमार यादवने तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात धडाकेबाज अर्धशतकी खेळी साकारली आणि भारताला एकहाती विजय मिळवून दिला. पण या दमदार कामगिरीनंतर सूर्यकुमारसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे.

वाचा-

सूर्यकुमारने या अर्धशतकी खेळीसह आयसीसीच्या ट्वेन्टी-२० क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या अर्धशतकानंतर आता सूर्यकुमारचे ८१६ गुण झाले आहेत. या क्रमवारीत अव्वल स्थानावर पाकिस्तानचा बाबर आझम आहे, त्याच्या नावावर ८१८ गुण आहेत. त्यामुळे सूर्यकुमारने चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात जर पुन्हा दमदार कामिगरी करत तीन गुण पटकावले तर तो बाबरला पिछाडीवर टाकत अव्वल स्थान पटकावू शकतो. त्यामुळे आता सूर्यकुमार चौथ्या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. या मालिकेतील तीन सामन्यांमध्ये सूर्यकुमारने आतापर्यंत १११ धावा केल्या आहेत. या मालिकेत अजून दोन सामने शिल्लक आहेत. त्यामुळेया दोन सामन्यांमध्ये सूर्यकुमार किती धावा करतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.

दुसरीकडे, इंग्लंडविरुद्धच्या तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रीझा हेंड्रिक्स १६ स्थानांनी पुढे सरकत १५व्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजचा फलंदाज ब्रॅंडन किंगनेही क्रमवारीत चांगली प्रगती केली आहे, तो २९वरून आता २७व्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आठ विकेट घेणारा दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीने गोलंदाजी क्रमवारीत १९ गुणांची कमाई केली आहे आणि तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. शम्सी एक स्थान मिळवण्यात यशस्वी झाला पण तो अव्वल स्थानावर असलेल्या जोश हेझलवूडच्या (७९२ रेटिंग गुण) ६४ गुणांनी मागे आहे. वेस्ट इंडिजचा फिरकीपटू अकिल हुसेन, इंग्लंडचा ख्रिस जॉर्डन, न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर आणि ईश सोधी यांनाही फायदा झाला. एकदिवसीय क्रमवारीत भारताचा सलामीवीर शिखर धवन एका स्थानाने 12व्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय गोलंदाज युजवेंद्र चहल (१६व्या) आणि शार्दुल ठाकूर (७२व्या) यांनीही क्रमवारीत चांगली प्रगती केली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.