मुंबई : भारताविरुद्ध पाहुणा दक्षिण आफ्रिका संघ टी-२० मालिका जिंकण्यापासून फक्त एक सामना दूर आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत दक्षिण आफ्रिका सध्या २-१ ने आघाडीवर आहेत. पहिल्या दोन्ही सामन्यात टेंबा बावुमाच्या संघाने जोरदार कामगिरी करत विजय मिळवला, तर टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात दणदणीत पुनरागमन करत आपले खाते उघडले. आता चौथ्या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा ‘हुकुमी एक्का’ एडन मार्करम उर्वरित सामन्यातून बाहेर पडला आहे.

वाचा – टीम इंडियात दाखल झाला धोकादायक फिनिशर; फिटनेसमध्ये विराटला टाकतो मागे

चौथा सामना १७ जून रोजी राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेत एडन मार्करमला एकही सामना न खेळता बाहेर पडणे भाग पडले आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने बुधवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सीएसएने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “एडन मार्करमला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात कोविड-१९ ची लागण झाल्याचे आढळल्यानंतर फलंदाजाने सात दिवस क्वारंटाईनमध्ये घालवले. तो शेवटचे दोन सामने खेळण्यासाठी पुनरागमन करू शकणार नाही.”

वाचा-मॅच जिंकण्यासाठी BCCI घेणार मोठा निर्णय; पंतचे कर्णधारपद...

अशा परिस्थितीत आता टीम इंडियासाठी मालिका विजयाची संधी चालून आली आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण मार्करम एक खतरनाक फलंदाज आणि भारतीय खेळपट्टींवर खेळण्याचा त्याला चांगलाच अनुभव आहे. याशिवाय क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने निवेदनात पुढे लिहिले आहे की मार्कराम स्वस्थ असून त्याला घरी परतण्याची परवानगी देण्यात आली आहे.

वाचा – शाहिद आफ्रिदीचे विराट कोहलीबद्दल संतापजनक वक्तव्य; म्हणाला आता…

मार्करम आऊट पण…
दरम्यान मार्करम मालिकेतून बाहेर पडला असला तरी दक्षिण आफ्रिकेसाठी चांगली बातमी अशी आहे की यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकच्या मनगटाच्या दुखापतीतून सावरला असून संघाचा वैद्यकीय विभाग त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवणार आहे. ट्विटमध्ये पुढे असे लिहिले आहे की, “यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने मनगटाच्या दुखापतीतून बरे होण्यात लक्षणीय सुधारणा केली आहे. वैद्यकीय कर्मचारी त्याच्या प्रगतीचे मूल्यांकन करत राहतील आणि चौथ्या सामन्यासाठी त्याच्या उपलब्धतेबाबत निर्णय घेतील.”

दक्षिण आफ्रिकेचा पराभव
मालिकेतील पहिले दोन टी-२० सामने सहज जिंकल्यानंतर, बावुमाच्या दक्षिण आफ्रिकेने विझागमधील तिसऱ्या सामन्यात ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला. एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर विजयासाठी १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हर्षल पटेल आणि युझवेंद्र चहल यांनी मिळून ७ विकेट घेत पाहुण्या संघाला १३१ धावांवर गुंडाळले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.