बीजिंग : चीनमध्ये २०१९-२० मध्ये करोना ससंर्ग सुरु झाल्यानंतर भारतीयांच्या व्हिसावर बंदी घालण्यात आली होती. चीनच्या या निर्णयामुळं हजारो भारतीयांना फटका बसला होता. करोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर चीननं मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिकांना व्हिसा देण्यात यावा, असा निर्णय चीननं घेतला आहे. या निर्णयामुळं हजारो भारतीय विद्यार्थी, चीनमध्ये नोकरी करणारी भारतीय आणि त्यांचे कुटुंबीय यांना दिलासा मिळाला आहे. भारतातील जे विद्यार्थी चीनमधील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात त्यांना देखील आवाहन केलं आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांशी अभ्यासक्रम पुन्हा सुरु करण्यासाठी संपर्क साधावा, असं चीननं म्हटलं आहे.

भारतीय संघ ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर, तिसऱ्या सामन्यात कोणता पराक्रम केला जाणून घ्या…
चीनच्या भारतातील दुतावासानं करोना व्हिसा धोरणात बदल केला आहे. भारतीयांच्या व्हिसाचे अर्ज स्वीकारले जातील, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. चीनमध्ये नोकरी करणाऱ्या भारतीयांसह त्यांच्या कुटुंबीयांचे व्हिसाचे अर्ज देखील स्वीरकारले जातील, असं सांगण्यात आलं आहे. २०१९-२० मध्ये चीनमध्ये करोना संसर्ग सुरु झाल्यानंतर भारतात परतलेल्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांसाठी हा मोठा निर्णय मानला जात आहे. गेल्या महिन्यातचं चीनमध्ये असलेल्या भारतीयांनी त्यांच्या कुटुंबीयांना चीनचा व्हिसा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, या मागणीसाठी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्याकडे विनंती केली होती.

मंत्रीजी पैसे कुठून आले? करोनामुळं स्मृती गेली, सत्येंद्र जैन यांचं ईडीला उत्तर

पर्यटन आणि इतर खासगी कार्यक्रमांसाठी चीनमध्ये जाणार असल्यास त्यांना व्हिसा देण्यात येणार नाही. एका रिपोर्टनुसार २३ हजार भारतीय विद्यार्थी चीनमधील वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात. करोना संसर्गाच्या काळात भारतात आल्यानंतर ते परत जाऊ शकलेले नाहीत. चीननं व्हिसा संबंधी नियम बदलल्यानं भारतीय विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. २३ हजार विद्यार्थ्यांपैकी १२ हजार विद्यार्थ्यांनी चीनमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली होती.

आमच्यासाठी भाषण महत्त्वाचं नाही, वारकऱ्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकू नका : दरेकर

भारतात सध्या करोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर चीन मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा देईल, हा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी चीनशी मैत्रीपूर्ण संबध असलेल्या पाकिस्तान, थायलंड, सोलोमन बेटे आणि श्रीलंकेच्या विद्यार्थ्यांना चीनमध्ये परतण्यास परवानगी देण्यात आली होती.

राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी ‘मविआ’ची बैठक; मुख्यमंत्री, शरद पवार बैठकीला उपस्थितSource link

Leave a Reply

Your email address will not be published.