भारताच्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बार्बाडोसच्या संघाला यावेळी रेणुका सिंगने एकामागून एक चार धक्के दिले. रेणुकाने यावेळी चार धक्के दिल्यामुळे बार्बाडोसचे कंबरडे मोडले गेले आणि तिथेच त्यांनी हा सामना गमावला होता. रेणुकाने यावेळी चार षटकांमध्ये फक्त १० धावा देत चार विकेट्स पटकावल्या. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी ही सुवर्णसंधी सोडली नाही. त्यांनी अचूक आणि भेदक मारा करत बार्बाडोसच्या धावसंख्येला चांगलेच वेसण घातले. त्यामुळेच बार्बाडोसच्या संघाने २० षटकांत ८ विकेट्स गमावत फक्त ६२ धावा करता आल्या आणि भारताने १०० धावांनी विजय साकारला.
भारताच्या क्रिकेट संघाने यावेळी १०० धावांनी दणदणीत विजय साकारला. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघाचा ६२ धावांत खुर्दा उडवण्याची किमयाही साकारली. भारताच्या क्रिकेट संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कमाल केली. भारताच्या संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत आपली गाडी रुळावर आणली होती. त्यानंतर आज भारतीय संघाने पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network