नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर (India Tour Of England 2022) रवाना झालाय. गुरुवारी टीम इंडियातील खेळाडू इंग्लंडसाठी मुंबईतून रवाना झाले. यात विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह हे महत्त्वाचे खेळाडू आहे. कर्णधार रोहित शर्मा या खेळाडूंसोबत दिसला नसला तरी तो नंतर संघासोबत जोडला जाईल असे समजते.

भारताचा इंग्लंड दौरा २४ जूनपासून सुरू होणार आहे. भारत पहिल्या कसोटी सामन्याच्या आधी एक सराव सामना खेळणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारत १ कसोटी, ३ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

वाचा- भारतासाठी धोक्याची घंटा; टीम इंडिया सोबत रोहित शर्मा इंग्लंडला का गेला नाही?

भारतीय संघ गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला होता. तेव्हा पाचवी कसोटी भारतीय संघातील खेळाडूंना करोना झाल्याने पुढे ढकलण्यात आली होती. आता दौऱ्याची सुरुवात पाचव्या कसोटीने होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ कसोटी मालिकेत २-१ने आघाडीवर आहे. बर्मिंघम मैदानावर जेव्हा टीम इंडिया पाचवी कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरेल तेव्हा त्यांना इतिहास घडवण्याची संधी असेल.

वाचा- बॉलिवूड अभिनेत्र्यांना टक्कर देते क्रीडा मंत्र्यांची पत्नी; अशी आहे लव्हस्टोरी

असा आहे भारताचा इंग्लंड दौरा (IND vs ENG Schedule)

२४ ते २७ जून: सराव सामना
१ ते ५ जुलै : पाचवा कसोटी सामना, बर्मिंघम
७ जुलै : पहिली टी-२०, साउथम्पटन
९ जुलै : दुसरी टी-२०, बर्मिंघम
१० जुलै : तिसरी टी-२०, नॉटिंघम
१२ जुलै : पहिली वनडे, द ओव्हल
१४ जुलै : दुसरी वनडे, लॉर्ड्स
१७ जुलै : तिसरी वनडे, मॅनचेस्टर

वाचा- विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या टीम इंडियाला जोरदार धक्का; ‘हुकुमी एक्का’ आफ्रिकेच्या संघात परतला

असा आहे कसोटीसाठीचा भारतीय संघ
रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, केएस भरत, रविंद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि प्रसिद्ध कृष्णाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.