नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. मालिकेतील ३ लढती झाल्या असून टीम इंडिया २-१ने आघाडीवर आहे. या मालिकेतील अखेरच्या दोन लढती अमेरिकेत होणार आहेत. पण आता या लढती होतील की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहेत.

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील अखेरच्या दोन लढती ६ आणि ७ ऑगस्ट रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे नियोजित आहे. पण आता या लढती रद्द होईल की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण भारतीय संघातील खेळाडूंना अद्याप व्हीसा मिळालेले नाही. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार भारत आणि वेस्ट इंडिजचे खेळाडू गुआनाला जातील. येथे अमेरिकेतील अधिकाऱ्यांशी सर्व खेळाडूंची बैठक होणार आहे.

वाचा-देशाला सुवर्णपदक मिळाले तो लॉन बॉल खेळतात तरी कसा? जाणून घ्या नियम आणि सर्व

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला आशा आहे की व्हीसा संदर्भातील अडचणी दूर होतील. पण जर असे झाले नाही तर सामने रद्द करण्याची वेळ येऊ शकते. दोन्ही संघातील हे टी-२० सामने अमेरिकेतील क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केले जात आहेत. भारतीय क्रिकेट संघ एक लोकप्रिय संघ आहे. यामुळे येथे सामने आयोजित केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. आता मात्र मालिकेतील अखेरच्या दोन लढती अडचणीत येतील असे दिसते.

या संदर्भात वेस्ट इंडिज क्रिकेटने म्हटले आहे की, बुधवारी सर्व खेळाडूंची गुआना येथे बैठक होणार आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली असून आशा आहे की व्हीसा मिळेल. यावर सध्या तरी आमचे कोणतेही नियंत्रण नाही.

वाचा-CWG 2022 Day 6 Live Updates: भारताला आणखी एक पदक, वेटलिफ्टिंगमध्ये

जर व्हीसा मिळाला तर दोन्ही संघातील खेळाडू गुआना हून मियामीसाठी रवाना होतील. हा प्रवास ५ तासांचा आहे. या मालिकेत फार गोंधळ झालेला दिसून आलाय. भारतीय संघाचे लगेज सेंट किट्सला न पोहोचल्याने दुसरा आणि तिसरा टी-२० सामना उशिरा सुरू झाला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.