नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेतील चौथा व पाचवा सामना अमेरिकेत खेळवण्यात येणार होते. पण आता हे दोन्ही सामने रद्द होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. पण जर अमेरिकेतील हे दोन्ही सामने रद्द झाले, तर ते कुठे खेळवण्यात येणार याचा मास्टर प्लॅन वेस्ट इंडिजच्या क्रिकेट संघटनेकडे तयार आहे.

वाचा-भारताला एकहाती विजय मिळवून दिल्यावर सूर्यकुमार यादवसाठी आली गूड न्यूज, पाहा काय घडलं…

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हे दोन्ही सामने ६ आणि ७ ऑगस्टला खेळवण्यात येणार आहेत. पण अजूनही भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांतील खेळाडूंना अजूनपर्यंत अमेरिकेचा व्हिसा मिळालेला नाही. त्यामुळे हे दोन्ही अमेरिकेतील सामने रद्द होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. जर हे दोन्ही सामने रद्द झाले तर ते खेळवायचे कुठे, हा प्रश्न वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाला पडला होता. कारण गेल्या काही दिवसांपासून खेळाडूंच्या व्हिसाची समस्या डोकं वर काढत होती. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने यासाठी एक मास्टर प्लॅन बनवल्याचे समोर आले आहे.

वाचा-रोहित शर्माने धडाकेबाज फटकेबाजी करत असतानाच मैदान सोडले

या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी अमेरिकेचा व्हिसा मिळाला नाही तर सामने कुठे खेळवायचे याबाबतचा निर्णय वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ घेऊ शकते. कारण ते या मालिकेचे यजमान आहेत. व्हिसाची समस्या गेल्या काही दिवसांपासून येत असल्यामुळे वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने याबाबत ‘प्लॅन-बी’ तयार केला आहे. जर हे दोन सामने अमेरिकेत खेळवले गेले नाहीत, तर दोन्ही संघांना सेंट किट्स येथेच ठेवण्यात येईल. त्यानंतर या दोन सामन्यांचे ठिकाण ठरवले जाईल. हे दोन्ही सामने कदाचित ब्रिजटाऊन किंवा पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवले जाऊ शकतात. पण हे दोन्ही सामने एकाच मैदानात होतील. कारण हे दोन्ही सामने सलग दोन दिवसांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे खेळाडूंना प्रवास करण्यासाठी वेळ नसेल. त्यामुळे हे दोन्ही सामने एकाच मैदानात खेळवले जातील. त्यामुळे आता जर अमेरिकेत सामने झाले नाहीत, तर चाहत्यांना चिंता करायची काहीच गरज नाही. पण या मालिकेचे आयोजन हे ढिसाळ झाल्याचे सर्वांपुढे आले आहे. खेळाडूंच्या बॅग्स वेळेत न आल्यामुळे दुसरा ट्वेन्टी-२० सामना तीन तास उशिराने खेळवण्यात आला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.