हिंगोली : हिंगोली ते वाशिम मार्गावर बासंबा ढाब्याजवळ भरधाव क्रूझर उलटून झालेल्या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी ११ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.ज खमींना बासंबा पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसद तालूक्यातील बेलोरा येथील तिघेजण आज सकाळी क्रुझर जीपने विद्युत पंप दुरुस्तीसाठी हिंगोली येथे आले होते. त्यानंतर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ते परत गावाकडे निघाले. हिंगोलीपासून काही अंतरावर असलेल्या बासंबा ढाब्याजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. या अपघातामध्ये जीपमधील तिघेही जखमी झाले. सुधीर तान्हाजी गडदे, दत्तराव शिवराम सोइगीर ( रा.बेलोरा ता.पूसद) यांच्यासह अन्य एकाचा समावेश आहे.

VIDEO: वादळी वाऱ्याचा फटका; अकोट सराफा बाजारातल्या इमारतीची गॅलरी कोसळली

या अपघाताची माहिती मिळताच बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमनवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मगन पवार, नाना पोले, पूजा पवार, गजानन कऱ्हाळे, वानोळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वाशिम कडून आंबेजोगाई कडे जाणाऱ्या एका कुटुंबाची कार थांबवून पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तीनही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

रवी राणांनी हनुमान चालीसेचा अपमान केल्याचा काँग्रेसचा आरोप, असं नेमकं काय केलं राणांनी ?Source link

Leave a Reply

Your email address will not be published.