मुंबई: अभिनेता कार्तिक आर्यन हे नाव सध्या विशेष चर्चेत आहे. कार्तिक आर्यन याचा ‘भूल भुलैया २’ (Kartik Aryan Bhool Bhulaiya 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अभिनेत्याने अलीकडेच केलेल्या पोस्टनुसार या सिनेमाने आतापर्यंत १७९.३१ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्याचप्रमाणे ज्या प्रमाणात हा सिनेमा प्रेक्षकवर्ग थिएटरमध्ये जाऊन पाहात आहेत, त्यानुसार हा सिनेमा विकेंड संपेपर्यंत १८५ कोटींपेक्षा जास्त कमाई करू शकतो. कार्तिक आर्यनने स्वत: पोस्ट करत सिनेमाच्या कमाईविषयी माहिती दिली आहे. पाचव्या शनिवारी देखील या सिनेमाने थिएटरमध्ये कमाल केली आहे.


दरम्यान कार्तिक आर्यन ज्याप्रमाणे आता थिएटरमध्ये धमाल करत आहे, त्याचप्रमाणे त्याचे चाहते देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. या चाहत्यांशी कार्तिकचे संभाषण नेहमीच विनम्र असल्याचे दिसून आले आहे. याची प्रचिती पुन्हा एकदा मुंबईत आली. कार्तिकमधील ‘सामान्य माणूस’ही चाहत्यांना पाहायला मिळाला. अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे वाचा-काजलला अभिनेत्याने न सांगताच केलं होतं किस? त्या घटनेची झालेली जोरदार चर्चा

अभिनेता कार्तिक आर्यन याचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो मुंबईच्या रस्त्यांवर स्ट्रीट फूड एंजॉय करताना दिसत आहे. यावेळी त्याचा मित्र अभिनेता सनी सिंग देखील त्याच्यासह आहे. अभिनेत्याला अशाप्रकारे स्ट्रीट फूड खाताना पाहून चाहत्यांनी देखील तिथे गर्दी केली आणि त्याच्यासह फोटो काढायला सुरुवात केली. कार्तिक देखील त्यांच्यासह सेल्फी काढण्यासाठी पोज देत असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

हा व्हिडिओ मुंबईतील जुहूमधील आहे. मुंबईकर स्ट्रीट फूड आवडीने खाताना दिसतात. सामान्य मुंबईकरांप्रमाणेच कार्तिकला अशाप्रकारे रस्त्यावरचं खाणं एंजॉय करताना पाहून त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून अनेकजण कार्तिकला ‘Down to Earth’ म्हणत आहेत. तर एका युजरने कमेंट केली आहे री ‘कार्तिकच्या डोक्यात यशाची हवा गेलेली नाही’.

हे वाचा-वादानंतर साई पल्लवीनं सोडलं मौन, म्हणाली, मला वाईट वाटलं की…

अभिनेता कार्तिक आर्यन याच्यासह ‘भूल भुलैया २’ सिनेमात कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा अजूनही थिएटरमध्ये प्रेक्षक खेचून आणण्यात यशस्वी होत आहे. तरीही अद्याप तुम्ही हा सिनेमा पाहिला नसेल तर तुम्हाला आता ओटीटीवर हा मुव्ही पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सवर १९ जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.