नवी दिल्ली : केरळ नंतर आता राजधानी नवी दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी राजधानीत मंकीपॉक्सचा आणखी नवा रुग्ण आढळून आला आहे. 31 वर्षीय नायजेरिन युवतीचा मंकीपॉक्सचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नवी दिल्लीतील मंकीपॉक्स रुग्णांची संख्या ४ वर पोहोचली आहे.

देशात मंकीपॉक्सच्या रुग्णांमुळं चिंता वाढू लागली आहे. केरळनंतर दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आहेल आहेत. राजधानी दिल्लीत आणखी रुग्ण वाढल्यानं चिंता वाढली आहे. ३१ वर्षीय तरुणीला संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे.

नवी दिल्लीत मंकीपॉक्सचे चार रुग्ण आढळले आहेत. देशात एकूण ९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी पाच हे केरळचे असून चार नवी दिल्लीत आढळले आहेत. नवी दिल्लीतील आढळलेल्या मंकीपॉक्सच्या रुग्णांपैकी तीन रुग्ण नायजेरियन होते. तर एक ३५ वर्षीय तरुण देखील मंकीपॉक्सनं बाधित झाला होता. मात्र, तो भारताबाहेर गेलेला नव्हता.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार, महागाई भत्ता ४ टक्केंनी वाढणार?

पहिल्या महिला रुग्णाची नोंद
भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे ९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी नवी दिल्लीत नव्यानं आढळलेल्या बाधित रुग्ण महिलेच्या त्वचेवर फोड आले होते तर ताप देखील आलेला होता. त्यानंतर तिला एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नवी दिल्लीत मंकीपॉक्स बाधित महिला आढळली असली तरी ती देशाबाहेर गेल्याची माहिती मिळत नाही. नवी दिल्लीत आढळलेला मंकीपॉक्सचा रुग्ण बरा झाल्याची माहिती आहे.

सौरव घोषालचा दणदणीत विजय, भारताला स्क्वॉशमध्ये कांस्यपदक

नवी दिल्लीत आतापर्यंत लोक नायक जय प्रकाश रुग्णालयात उपचार केला जात होता. मात्र, तीन खासगी रुग्णालयांना केंद्र सरकार परवानगी दिली आहे.उत्तर दिल्लीतील एमडी सिटी हॉस्पिटल, पूर्व दिल्लीतील कैलाश दीपक हॉस्पिटल आणि दक्षिण दिल्लीतील बात्रा रुग्णालयांना मंकीपॉक्सच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. रुग्णालयात विलगीकरण कक्ष उभारण्याचे देखील आदेश दिले गेले आहेत. दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात १० भेड ठेवण्यात आले आहेत. २० डॉक्टर देखील तैनात करण्यात आले आहेत.

संयुक्त अरब अमिरातमून आलेल्या केरळच्या २२ वर्षीय तरुणाचा मंकीपॉक्समुळं मृत्यू झाला आहे. ३० जुलै रोजी त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्या व्य्कतीचे नमुने पुण्यातील एनआयव्हीला पाठवले होते त्यावेळी त्यामध्ये भारतात परत आलेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

भारताची रौप्यपदकाला गवसणी, ज्युदोमध्ये २२ वर्षांच्या तुलिका मानने रचला इतिहासSource link

Leave a Reply

Your email address will not be published.