बीड: तालुक्यातील वडवाडी या ठिकाणी दहा ते बारा जणांनी धाडसी दरोडा टाकत नऊ लाख रोकडसह पाच तोळे सोने लंपास केलं आहे. घरातील लोकांनी विरोध केला असता दरोडेखोरांनी बेदम मारहाण केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

बीड तालुक्यातील शेतकरी वडवाडी या ठिकाणी बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष अभिमान अवसरमल यांच्या निवासस्थानी रात्री दीड ते दोनच्या दरम्यान दहा ते बारा दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी अभिमान अवसरमल आणि त्यांच्या पत्नी यांनी या दरोड्यात विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रचंड मारहाण केली. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील नऊ लाख रुपये रोकड आणि पाच तोळे सोनं घेऊन लंपास केल्याची घटना रात्री घडली आहे. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिल्यानंतर या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेत या ठिकाणी पंचनामा करत अज्ञात दरोडेखोरांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sanjay Raut: कोर्टात जाताना संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यात वाद, वाचा नेमकं काय घडलं?
दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध चालू केला आहे. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेमुळे घरातील अवसरमल दांपत्य हे भयभीत झाले आणि त्यांना या घटनेमध्ये मारहाण झाल्यामुळे त्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहें या घटनेने बीड जिल्ह्यात पुन्हा खळबळ माजली असल्याने बीड जिल्ह्यातील अस्थिरता आणि क्राईम कधी थांबणार आणि पोलिस प्रशासनाचा वचक राहिला की नाही हा प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे. मात्र, या धाडसी चोरीनंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांच्या अडचणींत वाढ; कोर्टाने सुनावली आणखी चार दिवसांची ईडी कोठडीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.