मुंबई: ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi Serial Update) ही मालिका प्रेश्रकांना भुरळ घालत आहे. सौरभ आणि अनामिका यांच्या प्रेमकहाणीला नुकतीच सुरूवात झाली आहे. या मालिकेत मुख्य व्यक्तिरेखांसह सहव्यक्तिरेखाही तितक्याच अधोरेखित होत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बॉस ही व्यक्तिरेखा. हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री भाग्या नायरचं (Bhagya Nair Marathi Serials) प्रेक्षक कौतुक करताहेत. या भूमिकेबद्दल भाग्या म्हणाली, ‘मालिकेत असणारी बॉस एकनिष्ठ आणि तत्त्व पाळणारी आहे. तिला कामात अजिबात आळस चालत नाही. ही व्यक्तिरेखा साकारताना खूप मजा येतेय.’


हे वाचा-कार कलेक्शन, आलिशान घर अन् कोट्यवधींचं मानधन; किती आहे तापसीची संपत्ती?

भाग्या नायर अमराठी असूनही मराठी मालिकांमध्ये तिने साकारलेल्या कामांचं विशेष कौतुक केलं जातंय. याआधी ती ‘रात्रीस खेळ चाले’च्या सिक्वेल सीझनमध्ये दिसली होती. त्यामध्ये तिने ‘कावेरी’ नावाची विविध छटा असणारी भूमिका साकारली होती. याविषयी बोलताना भाग्य पुढे असं म्हणते की, ‘ याआधी मी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत साकारलेली कावेरी ही भूमिका खूप वेगळी होती. मराठीनं मला एक वेगळी ओळख दिली आहे. युट्यूबवर काम करता करता मला मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.’


हे वाचा-या वेब सीरिज घेऊन येतायंत दुसरा सीझन, तुमची आवडती Series आहे का यादीत?

भाग्या नायर हा युट्यूबवरुन प्रसिद्ध झालेला चेहरा आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा चाहतावर्ग कमावला आहे. अमराठी असूनही तिचा मराठी प्रेक्षकवर्ग अधिक आहे, याचे महत्त्वाचे कारण म्हणते मराठी भाषेतील तिचा कंटेट. भाग्या पुढे म्हणते की, ‘अभिनयाला भाषा नसते असं मला वाटतं. मी अमराठी असूनही मराठी काम करतेय याचा मला आनंद आहे. माझ्या या प्रवासात मिळणारा अनुभव खूप मोलाचा आहे. ज्या कलाकारांना बघून मोठे झालो त्यांच्याबरोबर काम करता खूप काही शिकायला मिळतंय.’ मालिकेत भाग्याची व्यक्तिरेखा कमी लांबीची असली तरी प्रेक्षकांवर विशेष छाप पाडून जातेय. ती साकारत असलेल्या व्यक्तिरेखेमुळे मालिका अजून कोणती नवीन वळणं घेते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.