मुंबई : बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील स्पर्धक आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्नेहा वाघ हिनं बहिणीबरोबर अलिकडेच मुंबईची जीवन वाहिनी असलेल्या ट्रेननं प्रवास केला आहे. त्याची पोस्ट स्नेहानं सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सोनमला मुलगा होणार? अनिल कपूर यांच्या पोस्टमुळं चर्चेला उधाण

मनोरंजन विश्वामध्ये लोकप्रियता मिळवण्याआधी अनेक कलाकारांनी लोकलनं प्रवास केला आहे. परंतु एका लोकप्रियता मिळल्यानंतर हे कलाकार आलिशान गाड्यांनी फिरतात. आलिशान गाड्यांनी फिरत असताना अनेक कलाकारांना त्यांचे पूर्वीचे दिवस आठवतात आणि ते नॉस्टालिजक होतात. अभिनेत्री स्नेहा वाघ हिला देखील तिचे जुने दिवस आठवले आणि तिनं बहिणीबरोबर लोकल ट्रेनच्या प्रवासाचा आनंद लुटला. ते देखील तब्बल १५ वर्षांनंतर! लोकल ट्रेननं प्रवास करत असताना तिला कुणी ओळखू नये म्हणून स्नेहानं कॅप, गॉगल आणि चेहऱ्यावर मास्क लावला होता.
अजून किती खेचणार मालिका.. या मराठी मालिकांचे लेखक होताहेत ट्रोल
स्नेहानं तिच्या या लोकल प्रवासातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हो फोटो शेअर करताना पोस्ट लिहिली आहे. तिनं लिहिलं आहे की, ‘ माझे वडील मध्य रेल्वेत नोकरी करायचे. त्यामुळे लहान असल्यापासून मी लोकल ट्रेननं प्रवास केला आहे. परंतु आता १५ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा मी लोकल ट्रेननं प्रवास केला आहे. या प्रवासामुळे मला माझ्या जुन्या दिवसांची आठवण झाली…आणि त्याबरोबरच माझ्या वडिलांचीही प्रकर्षानं आठवण झाली… बाबांनी मी खूप मिस करते आहे.’ स्नेहाबरोबर या ट्रेन प्रवासामध्ये तिची बहिण कार्तिका देखील होती. सुरुवातीला त्या दोघींनी एसी ट्रेननं प्रवास केला मात्र त्यांनी सर्वसाधारण ट्रेननं प्रवास केला.

स्नेहाच्या कामाबद्दल सांगायचं तर ती बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात दिसली होती. त्याशिवाय स्नेहानं अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.