Malaika Arora Single Parenting Tips : ‘आई’ झाल्यानंतर स्त्रीचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. ज्या स्त्रीचं संपूर्ण आयुष्य हे फक्त तिचं असतं त्यावर आता तिच्या बाळाचा अधिकार असतो. आयुष्यात आता पहिली प्रायोरिटी, पहिलं महत्व हे तिच्या बाळासाठी असतात. अनेक महिला आपलं करिअर, घर आणि बाळाचं संगोपन ही जबाबदारी अतिशय उत्तमपणे सांभाळतात. स्वतः आई देखील मान्य करते की, बाळ झाल्यानंतर त्यांच आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. आता बाळ हीच त्यांची पहिली जबाबदारी असते.

या परिस्थितीतून फक्त सामान्य महिलाच नाही तर सेलिब्रिटी देखील जात असतात. बॉलिवूड दीवा मलायका अरोराचं आयुष्य बाळ झाल्यानंतर पूर्णपणे बदलून गेलं आहे. मलायकाने करिअर सोडलंच नाही तिने तिचं मदरहूड आणि करियर यामध्ये उत्तम समन्वय साधलं आहे.

मुलगा मोठा होत असूनही, मलायका त्याला चांगले पालनपोषण देण्याचे काम करते आणि सिंगल पॅरेंट असूनही प्रत्येक जबाबदारी पार पाडते. सिंगल मॉमचा प्रवास सोपा नसतो, असे मलायकाने स्वतः सांगितले आहे. एक ‘आई’ म्हणून तुम्हीही मलायकाकडून खूप काही शिकू शकता कारण तिने आयुष्यात अडचणी आणि आव्हानांना तोंड देऊनही हार मानली नाही. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​को – पॅरेंटिंग

मलायका अरोरा २०१७मध्ये आपल्या पतीपासून म्हणजे अभिनेता अरबाज खानपासून वेगळी झाली आहे. त्यानंतर तिने सिंगल पॅरेंट म्हणून जबाबदारी स्विकारली आहे. अरबाज देखील आपल्या मुलाच्या संगोपनाची जबाबदारी आवडीने सांभाळतो. महत्वाचं म्हणजे या दोघांनी घटस्फोट घेतला असला तरीही ते को-पॅरेंटिंग करत आहेत. यामधून या दोघांनी विभक्त झालेल्या पालकांना आपल्या मुलांना एकत्रितपणे सांभाळण्याचा अनोखा सल्ला दिला आहे. याचा आदर्श इतर पालक देखील घेऊ शकतात.

(वाचा – करोडो कमावणाऱ्या ‘या’ महिलेचा पालकांना सल्ला; ‘ही’ चूक करते मुलांच भविष्य खराब)

​आई झाल्यावर करिअर संपतं

असं म्हटलं जातं की, आई झाल्यावर स्त्रीचं संपूर्ण करिअर संपत. मग ते कोणत्याही बाबतीत असोत. मलायकाने मात्र हे विधान खोडून लावलं. मलायका मुलाच्या जन्मानंतर सतत काम करत आहे. आता तर हा ट्रेंड झाला आहे की, बाळ झाल्यानंतरही अनेक महिला आपलं करिअर सुरू ठेवतात. आणि त्या उत्तमपणे सांभाळतात. मलायका हा आदर्श सगळ्या स्त्रियांसमोर ठेवते.

(वाचा – पावसाळ्यात न्यू बॉर्न बेबींची कशी घ्याल काळजी? काय प्रकर्षाने टाळाल)

​सिंगल मॉम आहे मलायका

अभिनेता अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका अरोरा एकटी मुलाला सांभाळत आहे. एका मुलाखतीत मलायकाने सांगितलं की, असं वाटतं संपूर्ण संकट तुमच्यावर ओढावलं आहे. मलायका सांगते की, सिंगल मॉम होणं हे अतिशय कठीण काम आहे. यामुळे तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या येतात. पण असं करताना मलायका सिंगल मॉमसमोर एक आदर्श ठेवते.

(वाचा – ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या आईने ‘हे’ फळ खाल्यामुळे बिघडू शकते बाळाची तब्बेत?जाणून घ्या या मागचं सत्य)

​मुलाला करू देते चूका

मलायका अशा पालकांपैकी नाही जे आपल्या मुलांचे संरक्षण करतात. ती तिच्या मुलाला मोकळेपणाने शिकण्याची संधी देते आणि तिच्या मुलालाही आयुष्यात थोडी जागा देते. त्याच वेळी, मलायकाने मुलाचे चांगले पालनपोषण करण्यासाठी काम करत राहण्याचा निर्णय घेतला आहे. मलायका मुलाला त्याच्या अनुभवावरून शिकण्याची संधी देते. हे सगळ्या पालकांनी शिकण्यासारखं आहे. पालक म्हणून तुम्ही मुलांना मोकळीक द्या.

(वाचा – 43 व्या वर्षी बिपाशा बसु होणार आई; ‘या’ वयातील गर्भधारणेबद्दल काय म्हणतात डॉक्टर?)

​मलायका पालकांकडून शिकली

मलायकाच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आणि यामुळे ती खूप नकारात्मक झाली. आई-वडिल विभक्त झाल्यामुळे मलायका अगदी लहान वयातच स्वतंत्र झाली. तिच्या मुलाने स्वावलंबी व्हावे अशी तिची इच्छा आहे. त्यामुळे मलायका मुलाला मोकळेपणाने आणि आपल्या विचाराने जगण्याचा सल्ला देते. मलायका सल्ला देते की, आपल्या आजूबाजूच्या गोष्टींकडून खूप शिका. मुलांना मोकळेपणाने वाढू द्या. त्यामुळे मुलं आपल्या विचाराने वागायला शिकतात.

(वाचा – C-Section डिलिवरीपासून वाचण्यासाठी फॉलो करो ७ हेल्दी टिप्स; नॉर्मल डिलिवरीची शक्यता वाढेल)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.