मुंबई- जितकी बोल्ड तितकीच साधी मुलगी पडद्यावर साकारण्यात सई ताम्हणकरचा हातखंडा आहे. सईने अनेकदा चौकटी मोडून तिच्या भूमिका निवडल्या आहेत. सध्या सईची अगदी मराठी सिनेमांपासून ते आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या मंचापर्यंत जोरदार चर्चा सुरू आहे. एकामागून एक हिट सिनेमे, वेब सीरिजपासून ते आयफा अॅवार्डसारख्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर सईने नाव कोरलं आहे.

असं काय झालं की, हिमाचलला गेलेल्या प्राजक्ताला महाराष्ट्रात पळून यावंसं वाटतंय; पोस्ट व्हायरल

करिअरमध्ये तर ती एकेक शिखर सर करत आहेच पण गेल्या काही दिवसांपासून सईच्या आयुष्यात आलेल्या खास व्यक्तीमुळेही सई आनंदात आहे. हो माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे असं म्हणत सईने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो इन्स्टापेजवर शेअर केला होता. नुकतीच तिने महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या आयुष्यातील दौलतरावांविषयी सांगितलं. इतकच नव्हे तर नाती जपण्यासाठी काय केलं पाहिजे यावरही सई व्यक्त झाली.


सई ताम्हणकर यंदाच्या वर्षापासून वेगवेगळ्या भूमिका साकारून तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधत आहे. समांतर या वेबसिरीजमध्ये अत्यंत बोल्ड रूपात दिसलेल्या सईचं कौतुकही झालं आणि ती ट्रोलही झाली. पण बोलणाऱ्यांशी हुज्जत घालण्यापेक्षा सई नेहमीच तिच्या कामातून उत्तर देत असते हे यावेळीही सिध्द झालं. पेटपुराण ही वेगळया विषयावरची वेबसिरीज करून सईने तिच्या यशाचं खातं उघडलं. मिडियम स्पायसी या सिनेमातही ती दिसणार आहे. तर बेरोजगार या वेबसिरीजमध्ये सईने रंगवलेल्या वऱ्हाडी मुलगी सध्या गाजतेय. अबुधाबी येथे नुकताच झालेल्या आयफा अॅवार्डमध्ये सईला मीमी या सिनेमासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.


सईच्या भूमिका, तिचे नवे सिनेमे याकडे जसे तिच्या चाहत्यांचे लक्ष असते तसेच तिच्या व्यक्तीगत आयुष्यात काय चाललय हे जाणून घेण्यासाठीही तिचे चाहते आतूर असतात. पण सईदेखील तिच्या आयुष्यातील कोणतीच गोष्ट लपवत नाही असं ती नेहमी म्हणते. सई यापूर्वी अमेय गोसावी याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होती. ते नातंही तिने कधीच लपवलं नव्हतं. पण ते नातं काही टिकलं नाही.

सध्या सईच्या आयुष्यात फिल्ममेकर अनिश जोग आहे. अनिश आणि सई रिलेशनशीपमध्ये आहेत. सईने अनिशसोबत फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली. सई अनिशला एका खास नावाने हाक मारते आणि ते नाव आहे दौलतराव. माझ्या आयुष्यात दौलतराव आले अशी कॅप्शन देत सईने पोस्ट केलेला फोटो व्हायरल झाला होता. नुकताच आयफा अॅवार्ड जिंकल्यानंतर अनिश जोग म्हणजेच सईच्या दौलतरावांनी तिचं कौतुकही केलं.


महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सई म्हणाली, ‘मी नेहमीच माझ्या खाजगी आयुष्याविषयी जाहीरपणे बोलते. थोडे असले तरी जे काही सिक्रेट आहेत ते सांगायला मला आवडतं. त्यामुळे माझ्या आयुष्यात दौलतराव आले आहेत. पुढचे प्लॅन अजून ठरवलेले नाहीत पण ही खास व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे. नात्यांविषयी सांगायचं तर नातं जपणं ही रोजची प्रक्रिया आहे आणि ती सहज झाली पाहिजे.’

अजून किती खेचणार मालिका.. या मराठी मालिकांचे लेखक होताहेत ट्रोल

‘अहंकार, मी पणा नात्यात असू नये. नात्यासाठी वेळ दिला पाहिजे , पण अनेकदा आपण नातं सोडून दुसरीकडे वेळ देतो. नात्यात आपल्याला वेळेची गुंतवणूक करता येणं गरजेचं आहे. कुटुंब हा माणसाचा खूप मोठा आधार आहे पण नेमकं आपण तेच विसरत आहोत.’ सईच्या आयुष्यात दौलतराव म्हणून अनिशचा प्रवेश आणि तिच्या नात्याविषयीच्या संकल्पना यामुळे तिच्या चाहत्यांनी तिला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.