नवी दिल्ली :Nothing Phone (1) Lite: Nothing ने काही दिवसांपूर्वीच आपल्या पहिल्या स्मार्टफोनला लाँच केले आहे. या फोनला यूजर्सकडून देखील जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. रिपोर्टनुसार, आता कंपनी आपल्या पुढील फोनवर काम करत आहे. नथिंगच्या पुढील फोनचे नाव Phone (1) Lite असू शकते. डिव्हाइसच्या नावावरून लक्षात येते की हा Nothing Phone (1) च्या तुलनेत डाउनग्रेड स्पेसिफिकेशन्ससह येईल. मात्र, अद्याप केवळ याबाबत रिपोर्ट्स समोर आले आहेत, कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

वाचा: घरीच मिळेल थिएटरचा आनंद! तब्बल १५ हजारांच्या डिस्काउंटसह खरेदी करा ‘हा’ ५० इंच स्मार्ट टीव्ही; जाणून घ्या ऑफर

Nothing Phone (1) Lite हा कंपनीचा पहिला हँडसेट फोन (१) चे स्वस्त व्हर्जन असेल. या फोनमध्ये Glyph इंटरफेस आणि वायरलेस चार्जिंग मिळणार नाही. परंतु, लाइट व्हेरिएंटमध्ये ओरिजिनल फोनप्रमाणेच प्रोसेसर, डिस्प्ले आणि कॅमेरा सेंसर दिला जाईल. फोनसोबत बॉक्समध्ये एक चार्जर दिला जाईल. याशिवाय, यात ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली जाऊ शकते. नथिंगच्या या नवीन फोनच्या रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. या अपकमिंग लाइट व्हर्जनची किंमत २४,९९९ रुपये असू शकते. फोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येईल.

वाचा: तुमच्या आधार कार्डवर किती मोबाइल नंबर रजिस्टर्ड? असे घ्या जाणून

सध्या उपलब्ध असलेल्या नथिंग फोन (१) ची सुरुवाती किंमत ३२,९९९ रुपये आहे. या फोनप्रमाणेच चर्चित नथिंग फोन (१) लाइट अँड्राइड १२ आधारित Nothing OS वर काम करेल. हा फोन आयपी५३ रेटिंगसह येऊ शकतो. नथिंग फोन (१) बाबत भारतीय स्मार्टफोन यूजर्समध्ये विशेष चर्चा आहे. यूजर्सला या फोनकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे स्वस्त व्हेरिएंट लाँच करून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न कंपनी करू शकते. परंतु, कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही.

वाचा: ऑफिसच्या कामापासून ते गेमिंग… प्रत्येक गोष्टीसाठी उपयोगी येतील ‘हे’ दमदार लॅपटॉप्स, जाणून घ्या किंमतSource link

Leave a Reply

Your email address will not be published.