१५० रुपयांनी प्लान झाला महाग
रिलायन्स जिओचा ७४९ रुपयाचा प्लान आता ८९९ रुपयाचा झाला आहे. जर तुम्हाला याची माहिती नसेल तर तुम्हाला याची माहिती दिली जात आहे. हा प्लान फक्त जिओ फोन यूजर्ससाठी आहे. जर तुम्ही अन्य कोणत्याही फोनचा वापर करीत असाल तर हा जिओचा प्लान तुमच्यासाठी नाही. जिओ फोनच्या या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये ३३६ दिवसाची वैधता मिळते.
वाचा: Cooling Fan: एसीला देखील टक्कर देतो ‘हा’ हटके पंखा, करतो पाण्याची फवारणी; पाहा किंमत
यावर्षी १२ टक्के जास्त महाग होऊ शकतात प्लान
दरवर्षी टेलिकॉम कंपन्या आपल्या प्लानला महाग करीत आहे. त्यामुळे अशी शक्यता आहे की, लवकरच कंपन्या आपल्या प्रीपेड प्लानला आधीच्या तुलनेत महाग करणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका रिपोर्टनुसार, जिओ, एअरटेल आणि वोडाफोन सारख्या खासगी कंपन्या यावर्षी दिवाळी पर्यंत आपल्या प्रीपेड प्लानला १० ते २० टक्क्यांपर्यंत महाग करू शकतात. त्यामुळे प्लानची किंमत १०० रुपये असेल तर त्याची किंमत ११० रुपये ते ११२ रुपये होऊ शकते. टॅरिफ प्लान महाग केल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांना फायदा होईल. त्याचा सरासरी रेवेन्यू प्रति यूजर १० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
वाचा: WhatsApp चे नवीन फीचर येतेय, पेन ड्राइव्हमध्ये घेता येईल चॅटचा बॅकअप